Samantha Ruth Prabhu Instagram
मनोरंजन

एका गंभीर आजाराचा सामना करतेय समांथा रूथ प्रभू,उपचारासाठी शूटिंग थांबवून USA ला रवाना

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही केवळ साऊथमध्येच नव्हे तर संपूर्ण देशभरात लोकप्रिय आहे.

सकाळ डिजिटल टीम

Samantha Ruth Prabhu: दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही केवळ साऊथमध्येच नव्हे तर संपूर्ण देशभरात लोकप्रिय आहे. समांथाचे लाखो चाहते आहेत. कायम चर्चेत असलेली समांथा लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आयुष्मान खुरानासोबत समांथा तिच्या पहिल्या वहिल्या बॉलीवूड सिनेमामध्ये झळकणार आहे. समांथाच्या या बॉलीवूड एण्ट्रीसाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. उत्तम अभिनयासोबतच आरस्पानी सौंदर्याने घायाळ करणाऱ्या समांथाला मात्र सध्या एका वेगळ्याच अडचणीचा सामना करावा लागत आहे. समांथा एका गंभीर आजाराने त्रस्त आहे. या आजारावर उपचार घेण्यासाठी तिला शूटिंग सोडून परदेशात जावं लागलं आहे. (Samantha Ruth Prabhu struggle with health issue)

पुष्पा' सिनेमातील आयटम साँगमधून आपल्या अदाकारीने घायाळ करणाऱ्या समांथाला त्वचेशी निगडीत एका आजाराने ग्रासल आहे. यामुळेच ती लोकांमध्ये जाणंही टाळू लागली आहे. 'पॉलीमॉर्फ्स लाइट इरप्शन' हा त्वचेचा आजार समांथाला झाला आहे. या आजारात सुर्यप्रकाशात आल्याने संपूर्ण शरिराला खाज येते, वेदना होतात आणि डाग पडू लागतात. यामुळेच समांथाने सध्या शूटींगमधून ब्रेक घेतला आहे.

उपचारासाठी गाठलं अमेरिका

'पॉलीमॉर्फ्स लाइट इरप्शन' या आजारावर उपचार घेण्यासाठी समांथा अमेरिकेला गेली आहे. उपचारामुळे समांथाने तिच्या 'खुशी' या आगामी सिनेमाच्या शूटींगच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. या सिनेमात ती अभिनेता विजय देवरकोंडासोबत झळकणार आहे. सोशल मीडियावरही समांथा गेल्या महिनाभरापासून फारशी सक्रिय़ नसल्याचं दिसतंय. तसंच कोणत्याही इव्हेंटमध्ये जाणंही समांथा टाळते.

'फॅमिली मॅन -२' या हिंदी वेब सीरिजमधून झळकल्यानंतर समांथाकडे अनेक बॉलिवूड सिनेमांच्या ऑफर आल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर य़ा चर्चांवर शिक्का मोर्तबही झाला. काही दिवसांपूर्वीच समांथा अक्षय कुमारसोबत फिल्ममेकर करण जोहरच्या 'कॉफी विथ करण-७' या शोमध्ये पाहुणी म्हणून आली होती. समांथा लवकरच तो 'खुशी', 'यशोदा', शाकुंतलम या सिनेमांमधूम झलकणार आहे. या शिवाय समामथाच्या चाहत्यांना आता प्रतिक्षा आहे ती म्हणजे तिच्या बॉलीवूड पदार्पणाची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात ७५०० पैकी २००० पंप बंद, तरी मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात,'पुरेसा साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका'

लग्नाला नकार दिल्याने एक्सने प्रसिद्ध गायिकेला संपवलं; कालव्यात आढळला मृतदेह

Kolhapur Drowning Incident : वडिलांच्या समोर कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावर १२ वर्षीय मुलगा बुडाला

APMCत वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक, स्वच्छता विभागात बिल काढण्यासाठी कंत्राटदाराकडे १५ टक्क्यांची मागणी

Pune Nashik Highway: दारूच्या नशेत दुचाकीवरून प्रवासाचा हट्ट; मंचर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत टाळला अनर्थ, प्रसंगावधानामुळे आई-मुलांची सुखरूप भेट..

SCROLL FOR NEXT