Sambhaji Raje And  
मनोरंजन

Sambhaji Raje: मांजरेकर गाठ माझ्याशी..; संभाजीराजेंनी दिला दम

सकाळ डिजिटल टीम

पुणे - मागील काही दिवसांपासून ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीची चढाओढ लागली आहे. त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर मोठ्या प्रमाणात चित्रपट येत आहेत. मात्र नुकताच आलेला हरहर महादेव आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' यावरून वाद निर्माण झाला आहे. (Mahesh Manjrekar news in Marathi)

छत्रपती संभाजी महाराज म्हणाले की, सिनेमॅटिक लिबर्टी सध्या सुरू आहे ते ठीक आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रपटाला हे चालू शकत नाही. हर हर महादेव या चित्रपटात इतिहासाची मोडतोड आणि विपर्यास झाला. महाराजांकडे आपण अस्मिता आणि प्रेरणा म्हणून बघतो. सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून काहीही इतिहास दाखवायचा का? असा प्रश्नही संभाजी राजे यांनी उपस्थित केला.

चित्रपट बनवता ही चांगली गोष्ट आहेत. पेंढारकर यांनी काय छान चित्रपट बनवले होते. मात्र आता लोकांना आवडतं म्हणून काही चित्रपट बनवायचे का? "वेडात मराठे वीर दौडले सात" काय तो पोशाख हे काय मावळे आहेत का? असा प्रश्न संभाजी राजे यांनी महेश मांजरेकर यांचे पुत्र सत्या मांजरेकर याचा फोटो दाखवून उपस्थित केला. या चित्रपटात कुठल्या दृष्टीने हा मावळा वाटतो, असंही संभाजी यांनी विचारलं.

दरम्यान इतिहासाचा विपर्यास करणारे चित्रपट काढले तर गाठ माझ्याशी आहे. माझी सूचना आहे की तुम्हाला ऐतिहासिक चित्रपट काढायचे आहे तर त्यासाठी ऐतिहासिक समिती नेमली पाहिजे, अशी मागणीही संभाजी राजे यांनी केली.

इतिहासाचा विपर्यास होऊ देणार नाही. लोकांनी असे चित्रपट बघू नये, अस आवाहन करताना आपण सेन्सॉर बोर्डाला पत्र देणार असल्याचंही संभाजीराजे यांनी म्हटलं. तसेच शिवाजी महाराजांची भूमिका कोणीही करू शकतो. अक्षय कुमार असो किंवा दुसरा कुठलाही अभिनेता, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT