Sameeer Wankhede framed me for fame and forced me to hire his lawyer alleges model Munmun Dhamecha 
मनोरंजन

Sameer Wankhede Case: समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ; आता मॉडेल मुनमुन धमेचाने केले गंभीर आरोप

दोन वर्षापूर्वी क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये एनसीबीने ३ ऑक्टोंबरला मॉडेल मुनमुन धमेचा हिला अटक केली होती.

धनश्री ओतारी

मॉडेल मुनमुन धमेचा हिने आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा ठपका ठेवत समीर वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. अशातच आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.( Sameeer Wankhede framed me for fame and forced me to hire his lawyer alleges model Munmun Dhamecha)

दोन वर्षापूर्वी क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये एनसीबीने ३ ऑक्टोंबरला मॉडेल मुनमुन धमेचा हिला अटक केली होती. यावेळी ती चांगलीच चर्चेत आली होती. दरम्यान आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मिड-डे ला दिलेल्या माहितीनुसार, मुनमुन धमे भीतीपोटी गप्प बसली होती. पण आता सीबीआयने वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने सत्य बाहेर येईल. अशी अपेक्षा आहे. प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धीसाठी केवळ मीडिया प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्याने माझ्यासारख्या अनेकांना खोट्या प्रकरणात गोवले आहे.

त्यांना माहीत आहे की, मीडिया त्यांच्या कारवाईला कव्हरेज देईल. म्हणून वानखेडे सातत्याने मॉडेल्स आणि सेलिब्रेटींना टार्गेट करत होते.

ऑक्टोबर 2021 च्या पहिल्या आठवड्यात, एनसीबीने मुनमुन धमेचासह आर्यन खान आणि इतरांना अंमली पदार्थ बाळगणे, सेवन आणि तस्करीच्या आरोपाखाली अटक केली होती. मुनमुन धमे आणि आर्यन खान यांना 28 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

पुराव्याअभावी मे २०२२ मध्ये एनसीबीने दाखल केलेल्या आरोपपत्रात आर्यन खान आणि इतर पाच जणांची नावे नसली तरी एनसीबीने दाखल केलेल्या आरोपपत्रात मॉडेल धमेचे नाव आरोपी म्हणून ठेवण्यात आले होते.

मुनमुन धमे आहे तरी कोण?

मध्य प्रदेशची असणारी मुनमुन धमेचा एका उद्योगपती परिवारामधून आहे. मुनमुन धमेचा एक मॉडेल असून ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. मुनमुन धमेचाच्या आईचे निधन झाले होते. तीचा भाऊ प्रिंन्स भमेचा सध्या दिल्लीमध्ये राहतो.

मुनमुन धमेचाने तिचे शालेय जीवन मध्य प्रदेशातील सागर येथे पूर्ण केले. त्यानंतर काही काळ ती तिच्या भावासोबत दिल्लीमध्ये राहत होती.

मुनमुन धमेचा अनेक कलाकारांसोबत पार्टी करताना दिसून येत आहे. या संबधीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे. मुनमुन धमेचाने वरुण धवन, अर्जुन रामपाल, वीजे निखिल, गुरु रंधावा , सुयश राय यांसारख्या कलाकारांसोबत फोटो शेअर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : पीडीपी नेत्या इल्तिजा मुफ्ती यांनी बिजबेहरा येथील जाबलीपुरा फळ बाजारात फळ उत्पादकांच्या आंदोलनात सहभाग घेतला

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT