sameer paranjpe from sur nava dhyas nava viral post related ashok saraf and nivedita saraf SAKAL
मनोरंजन

Ashok Saraf: "गर्व म्हणा हवं तर..", अशोक सराफ यांच्याविषयी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

सूर नवा ध्यास नवा फेम गायक समीर परांजपेने अशोक सराफ यांच्याविषयी खास पोस्ट शेअर केलीय

Devendra Jadhav

अशोक सराफ हे मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेते. अशोक सराफ यांनी आजवर मराठी तसेच हिंदी सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.

अशोक सराफ यांच्याकडून कौतुकाची थाप मिळणं ही कोणत्याही माणसासाठी आनंदाची गोष्ट. अशातच सध्या सूर नवा ध्यास नवा शोमध्ये स्वतःच्या गायनाने रसिकांच्या गळ्यातला ताईत बनलेला अभिनेता - गायक समीर परांजपेने अशोक सराफ यांच्याविषयी खास पोस्ट लिहीली आहे.

(sameer paranjpe from sur nava dhyas nava viral post related ashok saraf)

समीर परांजपेने सोशल मीडियावर पोस्ट केलीय. यात समीर लिहीतो, "आजचा एपिसोड आजचं गाणं माझ्या आयुष्यातला तो क्षण आहे जो आयुष्यभर कायम अत्तरासारखा मनात दरवळत राहील आणि मला कायम विचारत राहील, गाणं करतोयस ना?
शूटींग सुरू झालं अशोक मामांची आणि निवेदिता ताईंची एन्ट्री झाली आणि मला बघून अशोक मामा म्हणाले अरे तू गातोस? मला वाटलं छान अभिनयच करतोस फक्त..मी पाहिलंय तुझं काम..छान करतोस काम.."

समीर पुढे लिहीतो, "ते मला ओळखतात त्यांनी माझं काम पाहिलंय हा माझ्यासाठी अभिनेता म्हणून अभिमानाचा क्षण होता. हो अभिमानच..गर्व म्हणा हवं तर.. आणि का नसावा? रविवारी दुपारी ४ वाजता दूरदर्शनवर लागणाऱ्या ह्यांच्या फिल्म्स बघत मोठे झालो आणि आज पहिल्यांदा ते भेटतात आणि हे बोलतात अजून काय हवं एखाद्या नवीन अभिनेत्याला.."

समीर शेवटी लिहीतो, "या एपिसोडला गाणंही ते मिळावं जे मला माझ्या गुरुंनी जवळपास २० वर्षांपूर्वी शिकवलं होतं.. प्रोमो बघून नीलूताईंचा अर्थात नीलकांती पाटेकर यांचा आशीर्वादरुपी मेसेज यावा . कृतज्ञता, रितेपण आणि वनवास संपल्याचा आनंद हे सगळं जगलोय मी..
एपिसोड बघा आणि एक आशीर्वाद नक्की द्या. "जीते रहो गाते रहो"."

समीरच्या या पोस्टवर निवेदिता सराफ यांनी, "असाच गात रहा कधीही गाणं सोडू नकोस खूप खूप शुभेच्छा." अशी कमेंट केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT