sameer wankhede aryan khan case cbi summons munmun dhamecha cordelia cruise  SAKAL
मनोरंजन

Sameer Wankhede Case: समीर वानखेडे प्रकरणाला वेगळं वळण, आता CBI ने या अभिनेत्रीला पाठवलं समन्स

समीर वानखेडेंवर आर्यन खानला सोडवण्यासाठी २५ कोटींची लाच मागीतल्याचा आरोप ठेवण्यात आला

Devendra Jadhav

Sameer Wankhede Case Update: आर्यन खानला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी NCB प्रमुख समीर वानखेडेंनी अटक केली. आर्यनला तुरुंगाची हवा खायला लागली.

आणि काही दिवसानंतर समीर वानखेडेंवर आर्यन खानला सोडवण्यासाठी २५ कोटींची लाच मागीतल्याचा आरोप ठेवण्यात आला. अशातच या सर्व प्रकरणात अभिनेत्री मुनमुन धमीचाला समन्स पाठवलं आहे.

(sameer wankhede aryan khan case cbi summons munmun dhamecha cordelia cruise)

कोण आहे मुनमुन धमीचा?

ज्या जहाजातुन आर्यन खानला अटक झाली याच जहाजातून आर्यन खानसोबत मॉडेल मुनमुन धमीचालाही अटक करण्यात आली होती.

CBI ने आता मुनमुन धमीचाला समन्स पाठवले असून तिला चौकशीसाठी बोलावले आहे. वृत्तानुसार, समीर वानखेडे प्रकरणात तिला CBINने चौकशीसाठी आणि जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी सध्या समीर वानखेडेची चौकशी सुरू आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये, मुनमुन धमीचालाही ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

मुनमुन धमीजा कोर्टात राहणार हजर

आता इंडिया टुडेच्या बातमीनुसार, सीबीआयने मुनमुन धमीचाला तिची जबानी नोंदवण्यासाठी समन्स पाठवले आहे. वृत्तानुसार, मुनमुन धमीचा 20 जुलैला स्वतः CBIसमोर हजर राहून आपले जबाब नोंदवणार आहे.

याशिवाय CBI कडून शाहरुख खान आणि त्याच्या मुलालाही जबाब नोंदवण्यासाठी बोलावले जाऊ शकते, असेही समोर आले आहे.

समीर वानखेडेंवर आरोप आणि जमीन

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवून अटक केल्याचा आरोप आहे.

त्यांच्यावर 25 कोटींची लाच मागीतल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या अंतर्गत तपासानंतर एनसीबीने आर्यनविरुद्धचा खटला रद्द केला आणि पुराव्याअभावी त्याला कोर्टाने क्लीन चिट देण्यात आली आहे.

आता मुनमुन धमीचाचा जबाब नोंदवल्यानंतर या प्रकरणाला आणखी कोणतं नवं वळण मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT