Sameer Wankhede ex NCB Officeer  
मनोरंजन

Sameer Wankhede Case Updates : वानखेडेंना मुंबई हायकोर्टाचा दिलासा, 'काहीही झालं तरी..'

एनसीबीचे माजी अधिकारी यांच्या सुनावणीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Sameer Wankhede ex NCB Officer Mumbai High Court : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख याच्या मुलाला अटक करणारे एनसीबीचे माजी अधिकारी यांच्या सुनावणीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई हायकोर्टानं वानखेडे यांना दिलासा दिला आहे. मुंबई कोर्टानं वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वानखेडे यांना ८ जुन पर्यत अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. अटकेपासून संरक्षण देण्याचा कोर्टाचा आदेश कायम ठेवण्यात आला आहे. यासगळ्या सगळ्यात कोर्टानं काही अटी वानखेडे यांच्यासमोर ठेवल्या आहेत. त्या म्हणजे त्यांना यापुढे आर्यन खान प्रकरणाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे व्हाट्स अप चॅट व्हायरल करता येणार नाही. यापूर्वी समीर वानखेडे यांनी बॉलीवूडचा किंग खान शाहरुख आणि त्यांच्यातील चॅट हे व्हायरल केल्याचे सांगण्यात आले होते. त्यावर कोर्टानं त्यांना समज दिली आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

समीर वानखेडे यांनी त्यांच्याकरिता पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. आपल्याला सोशल मीडियावरुन जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशातच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संरक्षण मिळावे, अशी मागणी वानखेडे यांनी कोर्टाकडे केली आहे. यापूर्वी वानखेडे यांनी माध्यमांना आर्यन खान केस प्रकरणातील काही गोष्टी शेयर केल्या होत्या. त्यानंतर वेगळ्याच चर्चांना उधाण आले होते. आता कोर्टानं त्याकडे लक्ष वेधले आहे.

वानखेडे यापूर्वी कोणतीही माहिती माध्यमांकडे शेयर करताना काळजी घ्या. कोणत्याही प्रकारचे चॅट व्हायरल होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. असे कोर्टानं म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे हे चर्चेत आले आहे. आर्यन खान अटकेप्रकरणी त्यांच्यावर २५ कोटींची खंडणी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT