Sameer Wankhede Tweet Shah Rukh Khan Jawan Movie I ever burned. I fear no hell yst88  esakal
मनोरंजन

Sameer Wankhede : 'पण मी कुणाच्या बापाला....' समीर वानखेडेंचं शाहरुखला सणसणीत उत्तर

आता एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या ट्विटनं पुन्हा एका वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

युगंधर ताजणे

Sameer Wankhede Tweet Shah Rukh Khan Jawan Movie : किंग खानचा जवान हा चर्चेत आला आहे. काल त्याच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्या सगळ्यात चर्चा होती ती शाहरुखच्या एका डायलॉगची. बेटे को हात लगाने से पहले बाप से बात कर...असा तो संवाद होता.

शाहरुखच्या त्या डायलॉग वरुन वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले होते. त्यावर आता एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या ट्विटनं पुन्हा एका वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यांनी केलेलं ट्विट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. वानखेडे यांनी निकोल लायन्स नावाच्या कवीची एक कविता पोस्ट करुन शाहरुखचे नाव न घेता त्याला अप्रत्यक्षपणे उत्तर दिले आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

जवानचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून शाहरुखच्या तोंडी असलेल्या त्या संवादानं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी शाहरुखच्या मुलाला आर्यन खानला एनसीबीनं अटक केली होती. एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांनी ही कारवाई केल्याचे दिसून आले होते. आर्यन खान वर ड्रग्ज घेतल्याचा आणि ते जवळ बाळगल्याचा आरोप करण्यात आला होता.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानं साऱ्या बॉलीवूडचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी अधिकारी वानखेडे यांच्यावर अनेक धक्कादायक आरोपही करण्यात आले होते. भ्रष्टाचाराचा आरोप हा त्यापैकी एक आरोप होता. अद्याप हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यावर सुनावणी सुरु आहे. अशातच शाहरुखच्या जवान चित्रपटातील त्या संवादानं वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.

शाहरुखच्या त्या संवादाचे कनेक्शन वानखेडे यांनी केलेल्या कारवाईशी संबंधित आहे. असा अंदाज नेटकरी आणि चाहत्यांनी बांधला आहे. वानखेडे यांनी शाहरुखच्या मुलाला अटक केली होती. यावेळी शाहरुख आणि वानखेडे यांच्यात बोलणेही झाले होते. अशीही चर्चा होती. त्यांच्या व्हाट्स अपचे चॅटही समोर आल्याची माहिती सुत्रांनी दिली होती.

अशातच येत्या काही दिवसांत शाहरुखच्या जवानच्या प्रदर्शनच्या निमित्तानं पुन्हा आर्यन खान आणि समीर वानखेडे प्रकरण चर्चेत आले आहे. त्यात वानखेडे यांनी जे ट्विट केले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, मला आगीशी दोन हात करणे काही अवघड नाही. मी त्या आगीसोबत नृत्य केले आहे. मला कुणाचीही भीती नाही. मी कुणाला घाबरण्याचे काहीही कारणही नाही. अशा शब्दांत वानखेडे यांनी ट्विट केले असून नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, वानखेडे यांनी शाहरुखला जशास तसे उत्तर दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway Accident : महामार्गावर ट्रॅव्हल अन् ‘ट्रेलर’चा भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

ठरलं तर मगची घसरण कायम पण तू हि रे माझा मितवाने गड राखला ; जाणून घ्या या आठवड्याचा टीआरपी

Bhiwandi: भिवंडी महापालिकेत बदलींचा धडाका, कामगार संघटनांची तीव्र नाराजी; कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

Jyotiba Temple : २५९ कोटींचा विकास आराखडा; जोतिबा-यमाई मंदिराचा होणार भव्य कायापालट

SCROLL FOR NEXT