kranti redkar, sameer wankhede  SAKAL
मनोरंजन

Sameer Wankhede Case: थेट दाऊदच्या नावाने पुन्हा धमकी, वानखेडेंची बायको क्रांतीचा धक्कादायक खुलासा

क्रांती रेडकरने एक धक्कादायक खुलासा केलाय ज्यामुळे चर्चांना तोंड फुटलंय.

Devendra Jadhav

Sameer Wankhede Case Update: समीर वानखेडेंना आर्यन खान केस प्रकरणात २५ कोटींची लाच मागितल्याप्रकरणी त्यांची कसून चौकशी सुरु आहे. समीर वानखेडे हे या प्रकरणात अनेक वेळा चौकशीला सामोरे गेले आहेत.

अशातच समीर वानखेडे यांची बायको क्रांती रेडकरने एक धक्कादायक खुलासा केलाय ज्यामुळे चर्चांना तोंड फुटलंय. समीर वानखेडेंना पुन्हा धमकी मिळाल्याचा खुलासा क्रांतीने केलाय. ते सुद्धा दाऊदच्या नावाने. काय आहे प्रकरण सविस्तर अपडेट होत आहे.

(sameer Wankhede's wife kranti redkar shocking revelation that threat again by the name of dawood)

TV ९ ला मुलाखत देताना क्रांती म्हणाली, “ या संपूर्ण केस प्रकरणात धमक्या देणं, ट्रोल करणं हे खूप आधीपासून सुरु आहे.

पण आम्ही अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायचो किंवा आम्ही विचार करायचो की अशा माणसांना ब्लॉक करुयात. पण दोन दिवसांपासून वेगळंच सुरू झालंय.

आता ज्या दोन ट्विटर हँडलवरून धमक्या येतायत, ते वेगळे वाटत आहेत. ते भारतीय ट्विटर हँडल नाहीत, आंतरराष्ट्रीय आहेत.

क्रांती पुढे म्हणते.. "या लोकांना भारत देश आवडत नाहीये. ते थेट दाऊदचं नाव घेऊन आम्हाला धमक्या देत आहेत, आमच्या मुलांची नावं घेत आहेत.

त्याचबरोबर ते भारतालाही शिवीगाळ करत आहेत. आपल्या केंद्र सरकारला, समीर वानखेडेंना शिवीगाळ करत आहेत. त्यांनी माझ्या दोन मुलींनाही त्यांनी धमकी दिली आहे.”

क्रांती शेवटी लिहिते ... “उद्या आमच्यावर किंवा आमच्या कुटुंबावर कोणताही हल्ला झाला, कोणी अॅसिड वैगरे फेकलं किंवा किडनॅप केलं, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न पडतोय.

त्यामुळे जे घडतंय, त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे. म्हणून आम्ही त्यांच्याविरोधात तक्रार देणार आहोत, त्यासाठी प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे,” असं क्रांती रेडकर ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटातल्या गूढ अपघाताचा उलगडा… कोकणातून हॉटेल चालकाचा फोन ठरला टर्निंग पाईंट! नाहीतर...

Kolkata Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने कोलकाता हादरले; लोक घाबरून घरं सोडून पळाले; बांगलादेशातही बसले हादरे

Television Day 2025: स्क्रीनवरचे डाग होतील गायब! ‘या’ 3 उपायांनी करा टीव्हीची परफेक्ट स्वच्छता

Latest Marathi News Live Update : कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई: हावडा-दुर्गापूरमध्ये २४ ठिकाणी छापे

Ashes 2025 England vs Australia : खरोखरची राख असलेली 'अ‍ॅशेस ट्रॉफी' आता कुठं आहे? त्यात नेमकी कशाची राख आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT