Samir Choughule exclusive interview e sakal about his new serial post office ughada ahe on sony marathi sakal
मनोरंजन

Samir Choughule: समीर चौगुले घेऊन येतोय बायकोला घाबरणाऱ्या निरगुडकरची गोष्ट..

‘पोस्ट ऑफिस उघडं आहे...’ या नवीन विनोदी मालिकेविषयी जाणून घ्या सर्वकाही..

सकाळ डिजिटल टीम

सोनी मराठीवरील ‘हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा कलाकार म्हणजे समीर चौघुले. रंगभूमी असो की छोटा वा मोठा पडदा असो, समीरने आपल्या अभिनयाचा चांगला ठसा उमटवला आहे. आता तो सोनीवरीलच ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे...’ या मालिकेत काम करीत आहे. यामध्ये त्याने अत्यंत विनोदी आणि संवेदनशील भूमिका साकारली आहे त्याविषयी त्याने 'सकाळ'शी मारलेल्या दिलखुलास गप्पा...

(Samir Choughule exclusive interview e sakal about his new serial post office ughada ahe on sony marathi )

‘पोस्ट ऑफिस उघडं आहे...’ या नवीन मालिकेचे कथानक नेमके काय आहे, या विषयी समीरला म्हणाला, 'ही कथा आहे पारगाव नावाच्या एका छोट्याशा गावातील पोस्टऑफिसची. ज्यावेळेला संपूर्ण देशातील पोस्ट ऑफिस उत्तम काम करत असतात त्यावेळेला ते पारगावचं पोस्ट ऑफिस असतं त्यांची कामगिरी चांगली होत नसते. त्यातच तेथील कर्मचारी संगणक युगाचा स्वीकार करतात आणि आपल्या पोस्ट ऑफिसला कसे भरभराटीचे दिवस येतात याची ही कथा आहे.

पुढे तो म्हणाला, 'ही कथा आहे तेथील कर्मचाऱ्यांच्या संघर्षाची, त्यांच्या मेहनतीची, त्यांच्या सुख आणि दुःखाची आहे. भारतीय पोस्टाचा आजपर्यंतचा प्रवास हा वैभवशाली आणि गौरवशाली राहिलेला आहे. यामध्ये पोस्ट कर्मचाऱ्यांचे फार मोठे योगदान आहे.

जेव्हा संगणक युग आलं तेव्हा सगळीकडेच हाहाकार माजला होता की हा काय प्रकार आहे? मीही स्वतः एकेकाळी बँकेत काम केलं आहे. मला माहिती आहे की जेव्हा संगणक युग आले तेव्हा सर्व कर्मचाऱ्यांनी ते कशा प्रकारे स्वीकारलं, त्यांचं संगणकांचं ट्रेनिंग दुसरीकडे कशा प्रकारे होतं, संगणक स्वीकारताना आलेल्या गमतीशीर अनुभवाची ही गोष्ट आहे. त्याचबरोबर संगणक आल्यावर वेळेप्रसंगी स्वतःच्या खिशातले पैसे टाकून कर्मचाऱ्यांनी पोस्टासाठी संगणक शिकून घेतला. या सगळ्या गोष्टी लोकांसमोर या मालिकेद्वारे येणार आहेत. फारच मजेशीर आणि गमतीशीर अशी गोष्ट या मालिकेत मांडलेली आहे.

हास्यजत्रेच्या टीमसोबत काम करून तुम्ही नेहमीच आम्हाला हसवत असता. आता पुन्हा त्याच टीमसोबत काम करतानाचा काय अनुभव आहे? याविषयी तो म्हणाला, 'संपूर्ण वेगळा अनुभव आहे. प्रभाकर मोरे, अरुण कदम, दत्तू मोरे, पृथ्वीक प्रताप, ईशा डे हीच हास्यजत्रेची टीम ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे...’ या मालिकेत तुम्हाला पहायला मिळणार आहे. हास्यजत्रेत १५ मिनिटांच्या स्कीटमध्ये विविध पात्रे साकारायची असतात. स्कीटमध्ये आमचे रिलेशनही वेगवेगळे असतात. एखाद्या स्किटमध्ये पृथ्वीक माझा जावई असू शकतो; तर दुसऱ्या स्किटमध्ये मी त्याचा बाप असू शकतो. पण इथे तसं नाहिये. इथे संपूर्ण वेगळी गोष्ट आहे पोस्टाची. त्यामुळे या कलाकारांसोबत तिकडे काम करणं आणि इकडे काम करणं वेगळं आहे. इथे प्रत्येकाची छान छान छोटीशी गोड भूमिका आहे. प्रत्येकाने त्याची त्याची भूमिका अगदी उत्तमरीत्या फुलवली आहे. त्यामुळे संपूर्ण वेगळा अनुभव मिळतोय.

हास्यजत्रेमध्ये विशाखा सुभेदार आणि तुमची केमिस्ट्री सर्वांनाच आवडलेली आहे. तर या मालिकेत तुम्हाला त्यांची उणीव जाणवते का? यावरही तो म्हणाला, ''नक्कीच. विशाखाची उणीव नक्की जाणवतेच. स्किटच्या पलीकडेही आमचे मैत्रीचे छान संबंध आहेत. त्यामुळे तिची कमी मला जाणवतेच. पण तिच्याही इच्छेला आपण मान दिलाच पाहिजे. कलाकाराला ज्या गोष्टीत रस असतो, जी गोष्ट आवडते तीच गोष्ट तो कलाकार करीत असतो. म्हणूनच त्याला मनस्वी कलाकार असं आपण म्हणतो. विशाखासोबतच इतरही जे हास्यजत्रेतले कलाकार मालिकेत नाहीयेत त्यांचीही उणीव जाणवते.''

या मुलाखतीत त्याने त्याच्या भुमिकेबद्दल ही सांगितले, तो म्हणाला, ''माझी यात एक निरगुडकर नावाची भूमिका आहे. ते त्यात मनीऑर्डर सेक्शन सांभाळत असतात. बायकोला प्रचंड घाबरणारा अशी ती भूमिका आहे. त्याची बायको फारच वाईट जेवण करत असते. त्यामुळे अशा सगळ्या परिस्थितीला तो तोंड देत असतो. अशी फारच गमतीशीर भुमिका आहे. अशीच प्रत्येकाची भुमिका त्यात छान फुलवली गेली आहे. त्यामुळे अक्षरशः मालिका पाहताना लोकं नॉस्टॅल्जिक होणार आहेत. प्रेक्षकांना ही मालिका नक्कीच आवडेल.

ही मुलाखत सायली आंगवलकर यांनी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीसाठी लागणार २४ हजार कर्मचारी

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Kannad News : हैदराबाद गँझेटीयरनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन देऊन केली मागणी

SCROLL FOR NEXT