Samir Choughule shared post for maharashtrachi hasya jatra fame actress esha dey birthday sakal
मनोरंजन

Samir Choughule: 'किडे' असणारी 'डे'.. हास्यजत्रेतील 'या' अभिनेत्रीसाठी समीर चौगुलेची खास पोस्ट

अभिनेता समीर चौगुलेच्या पोस्टनं वेधलं लक्ष..

नीलेश अडसूळ

Samir Choughule: गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. घराघरात पोहोचलेल्या या कार्यक्रमाने करोना काळातही आपल्याला हसवलं. हास्यजत्रेचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे.

या कार्यक्रमातील एक अविभाज्य घटक म्हणजे समीर चौगुले. समीर केवळ अभिनेता नाही तर तो या कार्यक्रमात लेखक म्हणूनही जबाबदारी पाहत आहे. आजवर त्याने आपल्या लेखनीने आणि अभिनयाने प्रेक्षकांचं भरगोस मनोरंजन केलं आहे.

समीर ने साकारलेला लोचण मजनू असो, शिवालीचा बाबा.. किंवा दाराचा आवाज.. त्याने कायमच आपल्या कलेचे जादू दाखवली आहे. आज त्याने आपल्या सहकारी अभिनेत्रीसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

(Samir Choughule shared post for maharashtrachi hasya jatra fame actress esha dey birthday)

ही पोस्ट आहे अभिनेत्री ईशा डे साठी. हास्य जत्रेतील एक महत्वाचा घटक असलेली आणि दर्जदार अभिनेत्री म्हणजे ईशा डे. आज ईशाचा वाढदिवस.. त्यानिमित्ताने समीर ने पोस्ट लिहिली आहे.

इशा सोबत एक फोटो शेअर करत समीरने लिहिलं आहे की, '' वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. इशा... गेल्यावर्षीच आमच्या हास्यजत्रेच्या चमूत दाखल झालेला तगडा गडी... फारच कमी वेळात हिने हास्यजत्रेच्या वातावरणाशी जुळवून घेतलं...''

''सहज सुंदर विनोदाची शैली आणि अत्यंत अप्रतिम आवाजाची दैवी देणगी लाभलेली आमची इशा ही लंडन ड्रामा graduate आहे...अगदी ब्रिटिशांचं इंग्रजी बोलू शकणारी आमच्या हास्यजत्रेतली ही एकमेव कलाकार...''

पुढे समीरने लिहिलं आहे की, ''हिच्या "डे" आडनावावरून ही लोकांना बंगाली वाटते पण ही महाराष्ट्रीयनच आहे ...पण मग ती "डे" आडनाव का लावते हा प्रश्न कृपया तिलाच विचारावा.....''

(maharashtrachi hasyajatra) ''स्वभावाने लोभस आणि तितकाच खट्याळपणा (किडे) जोपासणारी... आयुष्यात थोडं चांगलं किंवा थोडं मन हलवणार समोर घडलं की लगेच हिचे डोळे पाणवतात... कदाचित हळवेपणा हेच तिच्या स्वाभाविक अभिनयाचं मूळ आहे..आमच्या दोघांची जोडी skit मध्ये बेफाम फुलते......इशा.. तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...'' अशा शब्दात समीरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshay Kumar : एका क्षणात सगळं बदललं… अक्षय कुमारच्या वाहनाचा भीषण अपघात, रिक्षाचालक मृत्यूशी झुंजतोय, कसा घडला अपघात? Video पाहा

BMC महापौरपदासाठी आरक्षणाच्या सोडतीची चक्राकार पद्धत भाजप-शिवसेनेच्या अडचणीची, फक्त ठाकरेंकडेच 'ते' नगरसेवक

RCB Playoffs: सलग पाच विजयांसह स्मृती मानधनाचा संघ प्लेऑफमध्ये; मुंबई इंडियन्सला किती चान्स? दोन संघांची कडवी टक्कर

Karnataka Panchayat Elections : ग्राम, तालुका, जिल्हा पंचायत निवडणुका एकाचवेळी होणार; पंचायत राज व्यवस्थेत घडणार ऐतिहासिक बदल

Latest Marathi News Live Update : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून 41 MREGS च्या मजुरांना मिळणार बेरोजगार भत्ता

SCROLL FOR NEXT