मुंबई : कोरोना विषाणूने संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवेशिवाय कोणत्याही सेवा सुरू नाहीत. सामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वच घरी थांबले आहेत. या लॉकडाऊनदरम्यान सर्वच जण कोणतं ना कोणतं काम करण्यात रमले आहेत . काहींनी तर त्यांचे वाढदिवसदेखील घरच्या घरीच सोशल डिस्टंसिंग पाळत साजरे केले. यामध्ये आज क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आहे. त्याचा आज 47 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी सोशल मिडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अशातच अभिनेता समीर चौघुलेने देखील सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने सोशल मिडियावर सचिनचा एक फोटो शेअर करून त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने सचिनसाठी खास कॅप्शनदेखील लिहिली आहे.
ही पोस्ट शेअर करताना समीरने कॅप्शन लिहिली की, 'माझ्या देवाचा आज वाढदिवस. या देवाने आमच्या पिढीला खूप काही दिलं. आत्मसन्मान दिला, सुख दिलं, समाधान दिलं, आश्चर्य दिलं, धडधडता श्वास दिला, जागरणं दिली, शांत झोप दिली, नेमकी परीक्षांच्या काळात अनेक वेळा शंभर मारल्याने कमी मार्क दिले. खूप काही दिलं. २०११ चा वर्ल्ड कप जिंकल्यावर देवाला विराटने खांद्यावर बसवल्यावर ढसढसा रडवलं. देव रिटायर झाल्यानंतर त्याने केलेलं भाषण ऐकताना देव दिसेनासा होईल इतके अश्रू तरळले. वासिम अक्रमचं अब्दुल रझाकला “तेरे को पता है क्या तुने किसका कॅच छोडा है?” हे १००० वेळा पहायला लावलं. देवामुळे नाजूक आवाजात म्हटलेला “आयला” हा एक दैवी शब्द असल्याचा साक्षात्कार झाला. विरूने “बाप बाप होता है” म्हटल्यावर विरूबद्दलचा आदर द्विगुणीत झाला. झिंबाब्वेच्या हेन्री ओलांगाचं करिअर दोन मॅचमध्ये संपताना बघितलं. ‘१०’ नंबरच्या बाईक नंबरप्लेटसाठी जास्त पैसे द्यायला लावले. आता थांबतो. कारण लिहिण्यासारखं साचलेलं खूप आहे. ते आयुष्यभर साचलेलंच असू द्यावं हीच देवा चरणी प्रार्थना. सचिन सर वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!' अशा प्रेमळ, भावनिक आणि खास अंदाजात समीरने सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत.
मास्टर ब्लास्टर सचिनचा आज वाढदिवस असून दरवर्षी त्याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पण यावर्षी स्थिती जरा वेगळी आहे, त्यामुळे यावर्षी त्याने त्याचा वाढदिवस साजरा न करण्याचे ठरविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.