Sana Khan and Anas Saiyad baby boy name is Boy Saiyad Tariq Jamil  SAKAL
मनोरंजन

Sana Khan Baby Name: सना खानने लाडक्या लेकाचं ठेवलं अनोख नाव! लपलाय सुंदर अर्थ

सना आणि तिचे पती अनस सय्यद यांना मुलगा झाला

Devendra Jadhav

Sana Khan Baby Name News: सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री सना खानने बुधवारी ५ जुलैला इंस्टाग्रामवर आपल्या बाळ झाल्याची घोषणा केली. सना आणि तिचे पती अनस सय्यद यांना मुलगा झाला.

सना आणि तिचे पती अनस सय्यद यांनी त्यांच्या बाळाच्या आगमनाची बातमी त्यांचे चाहते आणि फॅन्ससोबत शेअर केली. सनाच्या फॅन्सने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सनाने बाळाचं नाव काय ठेवलंय, याची अनेकांना उत्सुकता होती. अखेर याचा उलगडा झालाय.

(Sana Khan and Anas Saiyad baby boy name is Boy Saiyad Tariq Jamil)

सना खान आणि अनस यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव सय्यद तारिक जमील ठेवले आहे. यावर स्पष्टीकरण देताना सना ई टाइम्सशी बोलताना म्हणाली, 'असे म्हणतात की नावाचा माणसावर खूप प्रभाव पडतो. म्हणून, आम्हाला पवित्रता, सौम्यता, काळजी आणि प्रामाणिकपणा दर्शवणारे नाव हवे होते. जमील म्हणजे सौंदर्य आणि तारिक म्हणजे आनंददायी. आई होण्याविषयी बोलताना सना म्हणाली, 'ही जगातील सर्वोत्तम भावनांपैकी एक आहे.'

बाळ झाल्याचा आनंद सोशल मिडीयावर सांगीतला

सनाने सोशल मिडीयावर मुलगा झाल्याचा आनंद शेयर केला होता. एक पोस्ट लिहून तिने एक छोटा व्हिडिओ दाखवला होता आणि लिहीलं होतं की,

"अल्लाह तलने मुकद्दर मै लिखा फिर उसको पुरा किया और आसन किया, और जब अल्लाह देता है तो खुश और मुसररा के साथ देता है.

तो अल्लाह तलने हमे बेटा दिया (अल्लाहने आमच्या नशिबात हे लिहिले आणि नंतर आम्हाला ही भेट दिली. जेव्हा अल्लाह आपल्याला काही देतो तेव्हा तो त्याच्या पूर्ण मनाने आणि आनंदाने देतो. अल्लाहने आम्हाला मुलगा दिलाय)."

बिग बॉस 6 आणि सलमान खानच्या 'जय हो' चित्रपटात काम करण्यासाठी लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या सनाने नोव्हेंबर 2020 मध्ये अनसशी लग्न करण्यापूर्वी तिची अभिनय कारकीर्द सोडली.

सना खानने लग्नानंतर ईस्लाम धर्मासाठी अभिनय क्षेत्र सोडलं असं सांगीतलं जातं यापूर्वी मार्च 2023 मध्ये तिने एका मुलाखतीत तिच्या गरोदरपणाच्या बातमीची पुष्टी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT