Sana Khan and Mufti Anas share video of honeymoon in kashmir 
मनोरंजन

काश्मिरच्या थंडीत सना खानचा 'हनिमून'; व्हिडिओ व्हायरल

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - अभिनेत्री होती मात्र काही कारणास्तव चित्रपटात काम सोडण्याचा निर्णय घेतला. लग्न झालं तेव्हा आता आपण पूर्णवेळ कुटूंबाला देणार असल्याचेही तिनं सांगितले. अशा सना खाननं तिच्या हनीमूनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. त्याला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

सना सध्या तिचा पती अनस सैय्यद सोबत काश्मिरमध्ये हनीमून एंजॉय करत आहे. तिनं तिथले फोटो व्हायरल केले आहेत. यावर सनाने एक स्टोरी इंस्टाग्रामवर शेयर केली आहे. ज्यात तिनं बुरखा घातलेला आहे. यावेळी ती सुंदर दिसत आहे. चहा पित असताना खोलीच्या बाहेरील नजारा न्याहाळण्याचा आनंद ती घेत आहे.

यापूर्वी सनाच्या पतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात तिच्या पतीला सना खोलीबाहेरील दृश्य दाखवत आहे. त्यावेळी पाठीमागून आलेला तिचा पती 'बेगम बहुत ठंड है।' हे सांगत आहे.

लग्नापूर्वी सना ही चित्रपटसृष्टीत कार्यरत होती. आता तिनं हे क्षेत्र सोडले आहे. याविषयीही तिनं सोशल मीडियावर लिहिलं होतं की, बंधू भगिनींनो मी चित्रपट क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

याचे कारण म्हणजे मी आयुष्याच्या एका वळणावर येऊन थांबले आहे. त्यावेळी मला माझा पती, त्यांच्या घरातील सर्वजण यांच्याशी आनंद आणि एकोप्यानं राहावे लागणार आहे. त्या घरासाठी माझी जबाबदारी अधिक वाढली आहे.  आयुष्याचे काही ध्येय असणे गरजेचे आहे. केवळ पैसे कमविणे हा त्याचा हेतू नसावा. मी त्यावर वेगळा निर्णय घेतला आहे. आपल्याला कुठल्याही वेळी काहीही होऊ शकते. तेव्हा जितके दिवस या जगात आहोत तोपर्यत चांगले काम करत राहायचे असे मला वाटते.

मला नेहमी आपण ज्यावेळी या जगातून जाणार त्यावेळी मागे काय उरणार हा प्रश्न पडतो. तेव्हा सतत कार्यरत राहणे आणि सतकार्याला वाहून घेणे जास्त महत्वाचे असल्याचे जाणवते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT