Sana Khan shares first glimpse of newborn son, introduces him to Quran  SAKAL
मनोरंजन

Sana Khan Baby Kuran: अवघ्या एक महिन्याच्या बाळाला शिकवतेय कुराण, अभिनेत्री सना खानचा व्हिडीओ चर्चेत

सना अवघ्या एक महिन्याच्या बाळाला कुराण शिकवताना दिसतेय.

Devendra Jadhav

Sana Khan Teach Her Baby Kuran Video Viral News: अभिनेत्री सना खान सध्या चांगलीच चर्चेत आहे. काहीच दिवसांपुर्वी सना खानला मुलगा झाला. सनाने ही बातमी सोशल मिडीयावर शेअर केली.

सना आणि तिचे पती अनस सय्यद यांनी त्यांच्या बाळाच्या आगमनाची बातमी त्यांचे चाहते आणि फॅन्ससोबत शेअर केली. आनंदाची बातमी शेअर करण्यासाठी तिने कुराणातील एक आयत शेअर केली होती.

आता सनाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयीवर व्हायरल झालाय. यात सना अवघ्या एक महिन्याच्या बाळाला कुराण शिकवताना दिसतेय.

(Sana Khan shares first glimpse of newborn son, introduces him to Quran)

अवघ्या एक महिन्याचं बाळ कुराण ऐकतोय

सनाने शेअर केलेल्या व्हिडीओत तिचं बाळ पाळणामध्ये खेळत आहे. तर काही खेळणी वर लटकत आहेत. आणि बाजुला कुराण पठणाचा आवाज येत आहे.

सना खानने व्हिडिओला एक कॅप्शन देखील लिहिले आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, 'मी पहिल्या दिवसापासून माझ्या मुलाला कुराण ऐकायला लावत आहे.'

याशिवाय सनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिचे पती मुफ्ती अनस सय्यद त्यांच्या मुलासोबत वेळ घालवताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये मुलाने सनाच्या पतीचे बोट त्याच्या चिमुकल्या हातांनी पकडले आहे. सनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.

काय आहे सनाच्या मुलाचं नाव?

सना खान आणि अनस यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव सय्यद तारिक जमील ठेवले आहे. यावर स्पष्टीकरण देताना सना ई टाइम्सशी बोलताना म्हणाली,

'असे म्हणतात की नावाचा माणसावर खूप प्रभाव पडतो. म्हणून, आम्हाला पवित्रता, सौम्यता, काळजी आणि प्रामाणिकपणा दर्शवणारे नाव हवे होते.

जमील म्हणजे सौंदर्य आणि तारिक म्हणजे आनंददायी. आई होण्याविषयी बोलताना सना म्हणाली, 'ही जगातील सर्वोत्तम भावनांपैकी एक आहे.'

सना खान विषयी थोडंसं...

बिग बॉस 6 आणि सलमान खानच्या 'जय हो' चित्रपटात काम करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सनाने नोव्हेंबर 2020 मध्ये अनसशी लग्न करण्यापूर्वी तिची अभिनय कारकीर्द सोडली.

सना खानने लग्नानंतर ईस्लाम धर्माचा स्वीकार केला. यापूर्वी मार्च 2023 मध्ये तिने एका मुलाखतीत तिच्या गरोदरपणाच्या बातमीची पुष्टी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT