sana khan 
मनोरंजन

पतीकडून सना खानला खास सरप्राइज; बुर्ज खलिफाच्या १२२व्या मजल्यावर दिली सोन्याची कॉफी 

स्वाती वेमूल

अभिनयविश्व सोडल्यानंतर सना खानने मौलाना मुफ्ती अनसशी निकाह केला. सलमान खानची सहकलाकार आणि माजी बिग बॉस स्पर्धक सना तिच्या लग्नामुळे खूप चर्चेत होती. आता सना पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. दुबईतील बुर्ज खलिफा या आलिशान इमारतीच्या १२२व्या मजल्यावर बसून सोन्याची कॉफी पित असल्याचा फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. याच फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे. सना तिच्या पतीसोबत दुबईत सुट्ट्यांचा आनंद घेतेय. याच ट्रिपदरम्यान पती अनसने सनाला खास सरप्राइज दिलं. दुबईत बुर्ज खलिफा इमारतीतील १२२व्या मजल्यावर जगातली सर्वांत उंचावर असलेलं 'अॅट मॉसफिअर' हे रेस्टॉरंट आहे. याच रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करण्याचं सरप्राइज अनसने दिलं. 

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये सना काचेच्या खिडकीजवळ बसून 'गोल्ड प्लेटेड कॉफी' पिताना दिसतेय. याचसोबत तिने ब्रेकफास्टमध्ये ऑर्डर केलेल्या काही पदार्थांचेही फोटो पोस्ट केले आहेत. 'जेव्हा तुमचा पती तुम्हाला बुर्ज खलिफाच्या रेस्टॉरंटमध्ये गोल्ड प्लेटेड कॉफीचं खास सरप्राइज देतो', असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.  

अचानकच घेतला लग्नाचा निर्णय
सना खानने इस्लाम धर्मासाठी चित्रपटसृष्टी सोडत असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं होतं. तिच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला होता. त्यानंतर अचानक तिच्या लग्नाची बातमी समोर आली. गुजरातचे मौलाना मुफ्ती अनसशी तिने निकाह केला. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. सनाने 'बिग बॉस'च्या सहाव्या पर्वात भाग घेतला होता. प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि डान्सर मेल्विन लुईसशी तिचं अफेअर होतं. लग्नाच्या काही महिन्यांपूर्वीच या दोघांचं ब्रेकअप झालं होतं. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT