sandeep pathak, arun nalawde, shwas, viththal SAKAL
मनोरंजन

Sandeep Pathak - Arun Nalawde: हि विठ्ठलाची कृपा... २१ वर्षानंतर अरुण नलावडे - संदीप पाठक एकत्र सिनेमात

सिनेमाच्या सेटवर २१ वर्षांनी संदीप अरुण नलावडे यांच्यासोबत काम करतोय

Devendra Jadhav

Sandip Pathak - Arun Nalawde: आपण ज्या सिनेमातून अभिनय प्रवासाला सुरुवात केली आहे. त्याच सिनेमातील कलाकार २१ वर्षांनी जेव्हा आपल्यासोबत काम करतो तेव्हा मनात शब्दात मांडता न येणारी भावना असते. असाच निःशब्द करणारा अनुभव संदीप पाठकच्या आयुष्यात आला. संदीप पाठकने श्वास सिनेमातून त्याच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. या सिनेमात अभिनेते अरुण नलावडे प्रमुख भूमिकेत होते.

संदीप आता अरुण नलावडे यांच्यासोबत विठ्ठल या आगामी मराठी सिनेमात अभिनय करत आहे. सध्या संदीप या सिनेमाचं शूटिंग करत आहे.या सिनेमाच्या सेटवर २१ वर्षांनी संदीप अरुण नलावडे यांच्यासोबत काम करतोय. त्यामुळे संदीप थोडा इमोशनल झाला. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर करून कॅप्शन लिहिलंय कि..

संदीप आता अरुण नलावडे यांच्यासोबत विठ्ठल या आगामी मराठी सिनेमात अभिनय करत आहे. सध्या संदीप या सिनेमाचं शूटिंग करत आहे.या सिनेमाच्या सेटवर २१ वर्षांनी संदीप अरुण नलावडे यांच्यासोबत काम करतोय. त्यामुळे संदीप थोडा इमोशनल झाला. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर करून कॅप्शन लिहिलंय कि..

सध्या मी “विठ्ठल” या मराठी चित्रपटाचे शुटींग करतोय,मी तीन वर्ष वारी केल्यामुळेच मला विठ्ठल नावाच्या सिनेमात काम मिळाले असं मी मानतो. अजून एक आनंद म्हणजे श्वास चित्रपटानंतर (२१ वर्षानंतर) मला अरूण नलावडे सरांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. लवकरच हा चित्रपट आपल्या भेटीला येईल….असं कॅप्शन संदीपने लिहिलंय.

या व्हिडिओत अरुण नलावडे यांनीही संदीपला आशीर्वाद दिले आहेत. अरुण नलावडे म्हणतात, "संदीपच्या आयुष्याची सुरुवात मी बघितली होती. आज माझ्या शेजारी विठ्ठलच बसलाय. या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी आहेत." असं अरुण नलावडे म्हणाले. पुढे संदीपला अरुण नलावडे यांनी आशीर्वाद दिले. अशाप्रकारे संदीप आणि अरुण नलावडे २१ वर्षांनी एकमेकांसोबत काम करत आहेत.

दोघांच्या वर्क फ्रंट बद्दल सांगायचं झालं तर... संदीप आता ढिशक्यांव या मराठी सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा १० फेब्रुवारी २०२३ ला रिलीज होतोय. तर दुसरीकडे अरुण नलावडे सध्या सोनी मराठीवरील प्रतिशोध या मालिकेत अभिनय करत आहेत. आता श्वास नंतर संदीप पाठक - अरुण नलावडे २१ वर्षांनी त्यांच्या अभिनयाची काय जुगलबंदी करणार, हे लवकरच विठ्ठल सिनेमात पाहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT