Sandra Bullock's partner Bryan Randall dead at 57  esakal
मनोरंजन

Bryan Randall Death: ऑस्कर विजेत्या अभिनेत्रीच्या पार्टनरचे गंभीर आजाराने निधन..

ब्रायन गेल्या तीन वर्षांपासून Amyotrophic Lateral Sclerosis या आजाराशी लढत होते. हा एक प्रकारचा मज्जासंस्थेशी निगडित आजार होता.

Vaishali Patil

Sandra Bullock's partner Bryan Randall dead at 57: ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब सारखे अनेक पुरस्कार जिंकणारी अभिनेत्री सँड्रा बुलक (Sandra Bullock) हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिचा लाँग टाईम पार्टनर ब्रायन रँडलचं  (Bryan Randall) निधन झालं आहे.

ब्रायन गेल्या तीन वर्षांपासून Amyotrophic Lateral Sclerosis या आजाराशी लढत होते. हा एक प्रकारचा मज्जासंस्थेशी निगडित आजार होता. जो मेंदू आणि पाठीच्या कण्यातील मज्जासंस्थेवर परिणाम करतो.

यामध्ये रुग्णाचे त्यांच्या स्नायूंवरील नियंत्रण गमावतो आणि कालांतराने हा आजार खूप गंभीर आणि अधिक धोकादायक बनतो. ब्रायन रँडल हा 57 वर्षांचा होता. तो प्रसिद्ध फोटोग्राफर होता.

ब्रायन रँडल हा गेल्या 2015 पासून सँड्रा बुलकसोबत रिलेशनशिपमध्ये होता. ब्रायनच्या कुटुंबीयांनी त्याच्या निधनाची बातमी चाहत्यांना दिली आहे. 'द टाइम्स'ला याबाबत एक निवेदन जारी केलं आहे.

यात त्यानी म्हटलं आहे की, तीन वर्षे एएलएसशी झुंज दिल्यानंतर ब्रायनचा 5 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. ब्रायनला त्याच्या आजाराबद्दल कुणालाही सांगायचं नव्हत त्याला ते गोपनीय ठेवायचं होत.

आता त्याच्या निधानानंतर त्याच्या कुटुंबीयांनी फुलांऐवजी एएलएस असोसिएशनसाठी देणगी देण्याचे आवाहन केले आहे.

2021 साली दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीनं सांगितलं होत की, 'ती जेव्हा घटस्फोटासारख्या परिस्थीतीतुन जात होती आणि त्या काळात तिला ब्रायन रँडलमध्ये तिचं प्रेम सापडलं.' त्यांनी लग्न केलेलं नव्हतं की, तिला एक योग्य जोडिदार आणि आई होण्यासाठी कागदाची गरज नाही. असं ती म्हणाली होती.

ब्रायन बद्दल सांगायचं झालं तर तो ओरेगॉनचा रहिवासी असून व्यावसायिक फोटोग्राफर आणि प्रसिद्ध मॉडेल होता. ब्रायनची फोटोग्राफी नावाची त्यांची स्वतःची कंपनी आहे. ब्रायन हा व्होग पॅरिस आणि हार्पर बाजार सिंगापूर सारख्या अनेक लोकप्रिय फॅशन मासिकांवर जेखील झळकलेला होता. त्याला त्याच्या पहिल्या बायकोपासून एक मुलगीही होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

Ashadhi Wari: पंढरपूरला चातुर्मासात रोज कीर्तनाची साडेतीनशे वर्षांची परंपरा

Flight Cancelled : तीन तासांची प्रतीक्षा अन् विमान रद्द

SCROLL FOR NEXT