prashant damle, prashant damle award SAKAL
मनोरंजन

Prashant Damle यांना राष्ट्रपतींच्या हस्ते 'संगीत नाटक अकादमी' पुरस्कार, मराठी नाटकांसाठी अभिमानाचा क्षण

अनेक कलाकारांनी आणि प्रेक्षकांनी प्रशांत दामले यांचं अभिनंदन केलंय

Devendra Jadhav

Prashant Damle News: आज राष्ट्रपतींच्या हस्ते अकादमी पुरस्कारांचं वितरण झालं. त्यानिमित्ताने अभिनेते प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी रत्न आणि सदस्यता पुरस्कार मिळाला आहे.

प्रशांत दामले यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा मोठा सन्मान झाला. मराठी रंगभूमीसाठी आणि मराठी नाटकांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

('Sangeet Natak Akademi' award to Prashant Damle by the President)

हा सन्मान स्वीकारताना प्रशांत दामले म्हणतात.. हा खुप मोठ्ठा सन्मान आहे. माझ्या सर्व सहकलाकारांच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या सर्व बॅक स्टेज कलाकारांच्या वतीने आणि फक्त महाराष्ट्र,

भारत नाही तर संपूर्ण जगातल्या मराठी नाट्य रसिकांच्या वतीने मी हा पुरस्कार अतिशय नम्रपणे स्वीकारत आहे. अनेक कलाकारांनी आणि प्रेक्षकांनी प्रशांत दामले यांचं अभिनंदन केलंय

'एका लग्नाची गोष्ट' या गाजलेल्या नाटकातील प्रशांत दामले यांची सहकलाकार आणि अभिनेत्री कविता मेढेकर यांनीही प्रशांत दामले यांचं अभिनंदन केलंय.

राष्ट्रपतींच्या हस्ते प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाल्याचा व्हिडिओ शेयर करत कविता म्हणतात.. आमच्यासाठी खूप अभिमानाचा क्षण.. अभिनंदन प्रशांत अशा शब्दात कविता ताईंनी प्रशांत दामले यांचं अभिनंदन केलंय.

मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील मोठं नाव म्हणून प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्याकडे पाहिले जाते. तीन दशकांहून अधिक काळ यांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. त्यांच्या नाटकांचा चाहतावर्ग मोठा आहे.

दामलेंच्या अनेक नाटकांचे पाच हजारांहून अधिक प्रयोग झाले आहेत. त्याला मिळालेला प्रतिसाद प्रचंड आहे.

अगदी एका दिवशी नाटकांचे ५ - ५ प्रयोग प्रशांत दामलेंनी केले आहेत. सध्या प्रशांत मराठी रंगभूमीवर कविता मेढेकर यांच्यासोबत एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकात काम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

शूटिंगदरम्यान ज्युनिअर एनटीआरला झालेली गंभीर दुखापत; खांद्यावर झाली शस्त्रक्रिया, आता 2 ते 3 महिन्यांचा घेणार ब्रेक

IND vs SL: शुभमन गिल-रिषभ पंत श्रीलंकेत धुमाकूळ घालणार? WTC मध्ये आजपर्यंत कोणालाही न जमलेला पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : तुम्ही मला अस्पृश्यासारखी वागणूक देता, 'शुद्धीकरण' करता आणि माझा अपमान करता."- खर्गे राज्यसभेत संतापले

‘Gift a Life After Life’! अवयवदानासाठी ५०० विद्यार्थ्यांचा पुढाकार; ‘Tree Of Life’मधून दिला जीवनाचा संदेश

SCROLL FOR NEXT