Sangita Ghosh is a mom to a seven-month-old baby girl, Revealed! Instagram
मनोरंजन

मुलीचा जन्म अभिनेत्री संगिता घोषनं लोकांपासून का लपवून ठेवला? झाला खुलासा

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री संगिता घोष 'स्वरण घर', 'दिव्य दृष्टी','परवरिश','कहता है दिल- जी ले जरा' अशा अनेक मालिकांमुळे घराघरात ओळखली जाते.

प्रणाली मोरे

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री(Tv Actress) म्हणून संगिता घोषचं(Sangita Ghosh) नाव एकेकाळी खूप चर्चेत होतं. देश मे निकला होगा चांद या मालिकेनं तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली होती. तिने स्वरण घर, दिव्य दृष्टी, परवरिश,कहता है दिल- जी ले जरा सारख्या अनेक मालिकांमधून काम करत प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. लोकांनी देखील तिनं साकारालेल्या भूमिकांची भरपूर प्रशंसा केली. पण आता संगिता घोष आपल्या कुठल्या मालिकेमुळे नाही तर एका बातमीमुळे चर्चेत आली आहे. तिनं कोणालाही कानोकान खबर लागू न देता थेट ७ महिन्यांनी आपल्या मुलीच्या जन्माचा खुलासा केला आहे. गोष्ट आनंदाची असूनही संगिताने लपवून का ठेवली यावर मात्र चर्चा रंगली होती. पण त्या दरम्यान आता संगितानं याचा खुलासा करत आपल्या मुलीचे नाव देखील चाहत्यांसोबत शेअर केले आहे.(Sangita Ghosh is a mom to a seven-month-old baby girl, Revealed!)

संगिता घोषनं २५ डिसेंबर,२०२१ रोजी आपल्या मुलीला जन्म दिला. काही दिवस आधी तिनं जयपूरमध्ये आपल्या मुलीसाठी पूजा आणि होम-हवन यांचे आयोजन केले होते. अभिनेत्रीनं सांगितलं की,तिची मुलगी ही सातव्या महिन्यात जन्माला आली. अर्थात इंग्रजी भाषेत प्रचलित असलेला शब्द त्यासाठी म्हणजे ती एक प्रीमॅच्युअर बेबी आहे. आणि त्याच कारणानं संगिताच्या मुलीला जन्मानंतर जवळ-जवळ १५ दिवस NICU मध्ये ठेवण्यात आलं होतं. संगिताचं म्हणणं आहे की तिला खरंतर आपण मुलीला जन्म दिला आहे हे लोकांपासून लपवायचं नव्हतं. फक्त योग्य वेळेची ती वाट पाहत होती.

संगिता घोष पुढे म्हणाली की, मुलीच्या जन्मानंतरचा काळ ती खूप एन्जॉय करत आहे. आपण एका मुलीची आई झालो आहोत यावर अजूनही आपला विश्वास बसत नाहीय असं संगीता म्हणाली. मला हे स्वप्नवत वाटत आहे. आपल्या मुलीचं नाव देवी असून ती खूप हसरी आहे,खेळकर आहे असं संगिता म्हणाली. संगीताचा नवरा हा एक बिझनेसमन असून त्यांची भेट ही जयपूरमध्येच झाली होती.

Sangita Ghosh is a mom to a seven-month-old baby girl, Revealed!

संगितानं मुलीला पहिल्यांदा कडकडून भेटले तेव्हाचा आनंद देखील शेअर केला. ती म्हणाली. जेव्हा पहिल्यांदा मी माझ्या मुलीला माझ्या हातात उचलून धरलं तेव्हा मी गायत्री मंत्राचा जप करीत होते. माझ्या कुशीत जेव्हा माझ्या मुलीने आपले इवलेसे डोळे उघडत माझ्याकडे हसून पाहिलं तो क्षण माझ्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. संगिता घोष मुलीला जन्म दिल्यानंतर आपल्या कामावर पुन्हा रुजु झाली होती.

'स्वरण घर' च्या शूटिंगला तिनं चंदिगढ मध्ये येऊन सुरुवात केली होती. मुलीला सोडून येणं तिच्यासाठी खूप अवघड होतं असं संगिता म्हणाली. पण नवऱ्यानं सपोर्ट केला म्हणून सगळं घडलं असं देखील अभिनेत्रीनं नमूद केलं. २५ जुलै रोजी माझी मुलगी देवी ७ महिन्याची होईल हे सांगत संगितानं पहिल्यांदा आपल्या चाहत्यांसमोर मुलगी झाल्याचा आनंद शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT