Sania Mirza Divorce
Sania Mirza Divorce esakal
मनोरंजन

Sania Mirza Divorce: 'सानियासोबत आता...' शोएब मलिकनं दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

Sania Mirza Divorce: टेनिस विश्वातील प्रसिद्ध महिला खेळाडू सानिया मिर्झा ही आता घटस्फोटाच्या चर्चेमुळे व्हायरल होताना दिसत आहे. यासगळ्यात तिचा पती पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकनं प्रतिक्रिया दिली आहे. त्यावरुन त्यांच्यात सगळं काही आलबेल आहे असे म्हणता येणार नाही.

सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाच्या बातमीनं मोठी खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे नेटकऱ्यांना, चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता शोएबनं एका मुलाखतीमधून पहिल्यांदाच सानियासोबतच्या घटस्फोटावर दिलेली प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी आहे. असे आता नेटकऱ्यांनी दिली आहे. घटस्फोटावर अद्याप अधिकृतपणे घोषणा झालेली नसली तरी त्याबद्दल आता नेटकऱ्यांना कळून चुकले आहे.

also read: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

बऱ्याच दिवसांनंतर अखेर शोएबनं त्या घटस्फोटांच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार शोएबनं म्हटलं आहे की, आता जे काही मी ऐकतो आणि वाचतो आहे त्यावर मला एक गोष्ट निक्षुन सांगायची आहे, ती म्हणजे हा आमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे. आणि मला आता त्यावरुन एकटे सोडून द्या. मी पाहिल मला त्यावर काय करता येईल ते. पण आता सानिया देखील तुम्हाला अशा बातम्यांवर कोणतंही उत्तर देणार नाही.

दुसरीकडे अशी एक चर्चा आहे की, हे दोघेही एका गोष्टीमुळे गप्प आहेत जी कायदयाच्या कचाट्यात दोघांना टाकू शकते. त्यामुळे ते शांत असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक या दोघांनी मिळून एका शो ची अनाउसमेंट देखील काही दिवसांपूर्वी केली होती. त्यावरुन ते अजुनही एकत्र आहेत असे म्हटले जात होते. मात्र पुन्हा त्यात शोएबची प्रतिक्रिया समोर आल्यानं वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. शोएबनं दिलेली प्रतिक्रिया देखील ही मोठ्या सावधानपूर्वक दिली गेली आहे असे चाहत्यांचे म्हणणे आहे.

२०१० मध्ये सानियासोबत केलं होतं लग्न ....

पाकिस्तानचा प्रसिद्ध क्रिकेटपटू शोएब मलिकनं २०१० मध्ये सानियाशी लग्न केलं. त्यावेळी हे लग्न वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. त्यामागील महत्वाचे कारण म्हणजे सानियाचे भारतीय असणे आणि तिनं एका पाकिस्तानी खेळाडूशी लग्न करणे. आता त्यांच्या वैवाहिक नात्याला आता घरघर लागली आहे. शोएबनं जी प्रतिक्रिया दिली आहे त्यावरुनं त्यानं आपल्याला सानियाशी घटस्फोट घेण्याविषयी गांभीर्यानं विचार करतो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT