sanika banaraswale joshi and uma pendharkar sakal
मनोरंजन

दिल, दोस्ती : मैत्रीची ‘रेशीमगाठ’!

मालिकेच्या निमित्तानं कलाकारांना अशी व्यक्ती मित्र म्हणून मिळते, जी कालांतरानं त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग बनते. अशाच दोन जिवलग मैत्रिणी म्हणजे सानिका बनारसवाले जोशी व उमा पेंढारकर.

सकाळ वृत्तसेवा

मालिकेच्या निमित्तानं कलाकारांना अशी व्यक्ती मित्र म्हणून मिळते, जी कालांतरानं त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग बनते. अशाच दोन जिवलग मैत्रिणी म्हणजे सानिका बनारसवाले जोशी व उमा पेंढारकर.

- सानिका बनारसवाले जोशी, उमा पेंढारकर

मालिकेच्या निमित्तानं कलाकारांना अशी व्यक्ती मित्र म्हणून मिळते, जी कालांतरानं त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग बनते. अशाच दोन जिवलग मैत्रिणी म्हणजे सानिका बनारसवाले जोशी व उमा पेंढारकर. ‘स्वामिनी’च्या सेटवर यांची पहिली भेट झाली. त्यापूर्वी दोघींनीही एकमेकींची कामं पाहिली नव्हती. सानिका सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून आपल्या भेटीला येते, तर उमा ‘कलर्स मराठी’वर लवकरच सुरू होणाऱ्या ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेत शंकर महाराजांची आई पार्वतीबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघींचाही स्वभाव विरुद्ध असल्यानं ‘विरुद्ध ध्रुवांत आकर्षण’ असं काहीसं त्यांच्या मैत्रीत झालं आणि हळूहळू ती खुलत गेली.

उमा म्हणाली, ‘आम्हा दोघींनाही आपली इतकी घट्ट मैत्री होईल असं पहिल्या भेटीत अजिबात वाटलं नव्हतं. मात्र, आमचं नातं इतकं बहरलं की, आता आम्ही एकमेकींच्या बहिणीच झालो आहोत. सानिका अत्यंत प्रामाणिक आहे. तिच्याशी मैत्री व्हायला वेळ लागतो, पण मैत्री झाल्यावर ती तुमच्या प्रत्येक पावलावर तुमची साथ देते. ती अतिशय प्रेमळ आहे. तिचा स्पष्टवक्तेपणा मला भावतो. सानिकाला एखादी गोष्ट पटली नाही, तर ती स्पष्टपणे सांगते. ती खरं व मनापासून बोलत असल्यानं तिचं स्पष्ट बोलणं उद्धटपणाचं वाटत नाही. ती कायम हसतमुख असते. सगळ्या गोष्टी ती शांतपणे हाताळते. ती उत्कृष्ट समीक्षक आहे. माझ्या कामाबद्दल, ‘यू मॅटर’ या माझ्या यू-ट्यूब चॅनेलच्या प्रत्येक व्हिडिओबद्दल काय आवडलं, काय चांगलं होऊ शकतं हे सांगते. यासोबतच ती उत्तम सिक्रेट किपर आहे. कामाच्या बाबतीतही ती तितकीच प्रोफेशनल आहे. ती सेटवर वेळेवर येते, कोणाबद्दलही गॉसिपींग करत नाही, मेहनत घेऊन आणि प्रामाणिकपणे तिचं काम करते. ‘स्वामिनी’ मालिकेत तिनं साकारलेली जानकीबाईंची भूमिका ती जगली आहे. यादरम्यान आम्ही दोघी सारख्याच दिसतो अशाही प्रतिक्रिया आम्हाला आल्या. आम्हा दोघींनाही एकमेकींची प्रगती व्हायला हवी असल्यानं आम्ही नेहमी एकमेकींना प्रोत्साहन देतो. त्यामुळं अभिनेत्री म्हणून आमच्या मनात एकमेकींबद्दल अजिबात असुरक्षितात नाही.’’

सानिकानं सांगितलं, ‘उमा खूप समजूतदार, भावनिक आणि जिद्दी मुलगी आहे. ती अत्यंत विचारी आहे. ती कोणाशीही चिडून, फटकळपणे बोलत नाही. काहीही करण्याआधी, बोलण्याआधी ती सगळ्यांचा विचार करते. ती रागावर उत्तमप्रकारे नियंत्रण ठेवते, ही गोष्ट तिच्याकडून शिकण्यासारखी आहे. सगळ्या गोष्टींमधला समतोल तिला छान साधता येतो. तिला मेकअपमधलंही उत्तम ज्ञान आहे. त्यातलं मला काही अडलं तर लगेच मी तिला फोन करते. आम्ही दोघीही कधीही एकमेकींशी हक्कानं कोणत्याही विषयावर बोलू शकतो. ‘स्वामिनी’च्या वेळी आम्ही मेकअप रूम शेअर करायचो, एकमेकींचं पाठांतर करून घ्यायचो. ऑफस्क्रीनही आमची मस्ती सुरू असायची. एक सहकलाकर म्हणून ती समोरच्याला सांभाळून घेते.

‘स्वामिनी’ मालिकेत तिनं साकारलेल्या पार्वतीबाई पेशवे या भूमिकेसाठी तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. यादरम्यान आम्ही भरपूर वेळ एकत्र घालवला. तिचं घर लांब असल्यानं ती माझ्या घरी राहायची. आता आपापल्या प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असल्याने आणि आमची घरंही वेगवेगळ्या ठिकाणी असल्यानं आम्ही लॉंग डिस्टन्स फ्रेंडशिपमध्ये आहोत, असंच म्हणावं लागेल. मात्र, मनानं पूर्वीइतक्याच जवळ आहोत.’’

(शब्दांकन - राजसी वैद्य)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon Prime Day Sale: आला रे आला अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ आला; मध्यरात्रीच सुरू होतोय धडका, मोठी संधी चुकवू नका!

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

SCROLL FOR NEXT