Sanjay Dutt Bollywood Actor News 
मनोरंजन

Sanjay Dutt : बाबाशी पंगा तर होणार दंगा! 'त्या' दिग्दर्शकाला तीन वर्ष राहावं लागलं इंडस्ट्रीबाहेर

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त हे भारतीय सिनेमा विश्वातील अजब व्यक्तिमत्व आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Sanjay Gupta Talks About Fight with Sanjay Dutt : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त हे भारतीय सिनेमा विश्वातील अजब व्यक्तिमत्व आहे. काहीसा रागीट, परखड आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या संजूबाबाचे अनेक वेगवेगळे किस्से हे चर्चेत असतात. चाहत्यांमध्ये वेगळ्या स्टाईलसाठी प्रसिद्ध असणाऱ्या संजूबाबाशी पंगा घेणं हे काही परवडण्यासारखे नसते, याचा प्रत्यय एका प्रख्यात दिग्दर्शकाला आला होता.

फिल्मी दुनियेत किरकोळ कारणासाठी वाद किंवा भांडणं ही काही नवीन नाही. त्यामुळे अनेकांनी इगो चा इश्यु करुन कित्येक वर्षे अबोला धरल्याची उदाहरणं सांगता येतील. त्यात अभिनेता संजय दत्तचे देखील नाव घ्यावे लागेल. बॉलीवूडमध्ये शोलेच्या दोस्तीची जशी उदाहरणं आहेत तशीच काट्याची टक्कर किंवा टोकाची दुश्मनी असणाऱ्या सेलिब्रेटींचीही यादी बरीच मोठी आहे.

संजूबाबाला त्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा राग आला होता, त्यानंतर त्यांच्यात मोठी वादावादीही झाली होती. याचा परिणाम असा झाला की, त्या दिग्दर्शकाला तीन वर्षे इंडस्ट्रीबाहेर राहावे लागले होते. त्या दिग्दर्शकाचं नाव होतं संजय गुप्ता. संजय दत्त आणि संजय गुप्ता यांच्यातील विसंवादाचा फटका दिग्दर्शक संजय गुप्ताला मोठ्या प्रमाणावर बसला होता. ९० च्या दशकांत या दोघांनी एकत्रित काम केले होते.

२००० चे साल उजाडले आणि संजय गुप्ता आणि संजू बाबा यांच्यात वाद सुरु झाला. या दोघांच्या एकत्रित प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्यांचा आतिष नावाचा चित्रपट १९९४ मध्ये आला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. बॉक्स ऑफिसवर तो काही प्रमाणात यशस्वीही झाला होता. संजय दत्तला त्यातून मोठी प्रसिद्धीही मिळाली होती. त्यानंतर दोघांनी अनेक चित्रपट केले.

तुम्हाला जर संजय दत्तचा काटे, प्लॅन, मुसाफिर आणि जिंदा नावाचे चित्रपट आठवत असतील तर त्या चित्रपटांचे दिग्दर्शन संजय गुप्तानं केले होते. त्यानंतर मात्र त्यांच्यात वाद सुरु झाला. दिग्दर्शकानं एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, आमच्यात थोडा विसंवाद झाला, त्यामुळे अबोला तयार झाल्यानं आम्ही पुन्हा एकत्रित काम केले नाही.

मला वाटतं आमच्यात जी भांडणं झाली ती आमच्या जवळच्या काही लोकांमुळे झाली असे म्हणावे लागेल. त्यांच्यामुळे आमच्यात गैरसमज तयार झाले. या कारणामुळे आमच्यात चार वर्षे अबोला होता. तीन वर्षे माझ्याकडे कोणतेही काम नव्हते. लोकांनी माझे फोन घेणे बंद केले होते. संजय दत्तनं अनेकांना सांगितले होते की, माझ्यासोबत कुणीही काम करु नये. असं जे बोललं जातंय त्यात काही तथ्य नाही.त्यानं कुणाला काहीही सांगितलं नव्हतं. असेही संजय गुप्ता यांनी यावेळी सांगितले.

बिग बी अमिताभ बच्चन यांचा ७० वा जन्मदिवस होता. त्यानिमित्तानं संजय दत्त आणि संजय गुप्त यांच्यातील वाद मिटला असे सांगितले जाते. त्यावेळी संजूबाबानं संजय गुप्ताला नावानं हाक मारुन त्याची भेट घेतली, त्याची विचारपूस केली. त्यावेळी आम्ही आमच्यात एक नियम केला. तो म्हणजे आम्ही पुन्हा कधीही एकत्र काम करणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fighter Jet Crash: मोठी बातमी! बांगलादेशमध्ये हवाई दलाचे विमान शाळेवर कोसळले, एकाचा मृत्यू, अनेक जखमी, Video Viral

अहान पांडे आणि अनित पड्डा आहेत तरी कोण? 'सैय्यारा'मधील गाजलेल्या 'या' जेन झी जोडीविषयी जाणून घ्या सर्वकाही

मुंबई विमानतळावर थरार! Air India फ्लाइटचे 3 टायर फुटले; मुसळधार पावसात नेमकं काय घडलं, प्रवाशांची काय स्थिती?

Harbhajan Singh: 'तूच माझ्या बाबाला मारलंस ना?' जेव्हा श्रीसंतच्या मुलीने हरभजनला केला थेट सवाल

Video : मैत्रीण दुबईत पोहोचली अन् मी अजून ट्रॅफिकमध्येच... बंगळुरुमधील महिलेचा व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT