Sanjay Dutt Injured Esakal
मनोरंजन

Sanjay Dutt Injured': केडी'चित्रपटात बॉम्बस्फोटाचा सीन शूट करताना संजय दत्त गंभीर जखमी

Vaishali Patil

संजय दत्त बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. हे काही वेगळ सांगायची गरज नाही. गेल्या अनेक वर्षांपासून तो इंडस्ट्रीत काम करतोय. आता संजू बाबानं बॉलिवूड चित्रपट सोडून आता टॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला आहे. तो साउथच्या केजीएफ मध्येही दिसला .

संजय दत्तबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. शूटिंगदरम्यान संजय जखमी झाला आहे. संजय सध्या त्याच्या आगामी 'केडी - द डेव्हिल' या कन्नड चित्रपटाचे शूटिंग बेंगळुरूच्या जवळच्या भागात करत आहे.

संजय फाईट मास्टर डॉ. रवि वर्मा यांच्या 'केडी: द डेव्हिल' या चित्रपटासाठी फाईट कम्पोज करत होता. त्यावेळी बॉम्बस्फोटाच्या सीक्वेन्सचे शूटिंग सुरू होता दरम्यान या बॉम्बस्फोटाचे शूटिंग करताना स्फोट झाला आणि संजय जखमी झाला आहे.

Sanjay Dutt Injured

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयच्या कोपर, हात आणि चेहऱ्यावर खूप जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे.

ही बातमी समोर आल्यानंतर संजय दत्तचे चाहते चांगलेच चिंतेत पडले आहेत. ते लवकर बरे व्हावेत यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. अद्याप त्याच्या प्रकृतीची माहिती समोर आलेली नाही.

प्रेम यांनी दिग्दर्शित केलेला KD: The Devil हा सिनेमा KVN बॅनरखाली तयार करण्यात येत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ज्याचे पोस्टर तिने काही दिवसांपुर्वीच शेअर केले आहे.

संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाले तर, तो शेवटचा रणबीर कपूर आणि वाणी कपूरसोबत 'शमशेरा' चित्रपटात दिसला होता. 'शमशेरा' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.  संजय लवकरच त्याच्या आगामी चित्रपटात रवीना टंडनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

leopard Attack: हृदयद्रावक घटना! चार वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; गोंदियात जीव मुठीत धरून मुले घरातच, सहानंतर सामसूम!

Latest Marathi News Live Update : बीडच्या ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांच्या कुटुंबाला न्याय; आंदोलनानंतर कारखान्याकडून २१ लाखांची मदत

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

Aquarius Yearly Horoscope : कुंभ राशीला साडेसातीचा त्रास, पण यंदाच्या वर्षात नेतृत्व गुण उजळतील

SCROLL FOR NEXT