maanayata dutt Sakal
मनोरंजन

Maanayata Dutt: संजू बाबाची बायको मालदीवमध्ये करतेय एन्जॉय, चाहते म्हणाले, वहिनी तुम्ही तर...

संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Aishwarya Musale

बाबा म्हणून प्रसिद्ध असलेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्त खूप लोकप्रिय आहे. मात्र, त्याची पत्नी मान्यता दत्तच्या लोकप्रियतेत कोणतीही कमी नाही. मान्यता चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे २३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याचबरोबर ती अनेकदा फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.

सध्या सोशल मीडियावर मान्यताचा एक व्हिडिओ चर्चेत आहे. ती तिच्या दोन मुलांसह शाहरान दत्त आणि इकरा दत्तसह मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे. इंस्टाग्रामवर तिथला एक मॉन्टेज व्हिडिओ शेअर करून तिने आपल्या ट्रिपची झलक दाखवली आहे.

या व्हिडीओमध्ये मान्यता खूपच ग्लॅमरस दिसत आहे आणि पाण्याच्या मधोमध एन्जॉय करत असल्याचे दिसून येते. या व्हिडिओमध्ये तिने तिचे वेगवेगळे लूक दिले आहेत. व्हिडिओमध्ये तिच्यासोबत तिची मुलंही दिसत आहेत.

व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जीवन हे एका समुद्रासारखे आहे. ते शांत किंवा स्थिर आणि खडबडीत किंवा कठोर राहू शकते. पण शेवटी ते नेहमीच सुंदर असते." मान्यताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर लोक त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करत आहेत.

मान्यताच्या या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ही इतकी सुंदर का आहे? दुसर्‍या यूजरने लिहिले की, "भाभी जी तुम्ही मस्त दिसताय, चमकत राहा." एका यूजरने काव्यमय पद्धतीने कौतुक करताना लिहिले, "चेहरा है या चांद खिला है." कमेंट करताना एका चाहत्याने तिला इस्टरसाठी शुभेच्छा दिल्या.

अशा आणखी अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. संजय दत्त आणि मान्यता दत्त यांनी 2008 साली एकमेकांशी लग्न केले होते. संजयप्रमाणे तीही अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT