Sanjay Leela Bhansali esakal
मनोरंजन

Sanjay Leela Bhansali : 'जोपर्यत मी सांगत नाही तोपर्यत कुणीही...' भन्साळींचा वेगळाच दरारा!

प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याची गोष्टच वेगळी आहे. बॉलीवूडमध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख भन्साळी यांनी निर्माण केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sanjay Leela Bhansali : प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याची गोष्टच वेगळी आहे. बॉलीवूडमध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख भन्साळी यांनी निर्माण केली आहे. जे काही करायचं ते उत्तम आणि भव्यदिव्य करण्यासाठी ओळख असलेल्या भन्साळी यांच्या चित्रपटाचं निर्मितीमुल्य नेहमीच सर्वोत्तम राहिलं आहे. भन्साळी आता वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहे.

भन्साळी हे सध्या सोशल मीडियावर त्यांच्या हिरामंडी नावाच्या चित्रपटामुळे चर्चेत आले आहे. त्याचे कारण या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हायरल झाला आहे. गंगुबाई काठियावाडी नंतर भन्साळी हिरामंडीवर मेहनत घेताना दिसत आहे. भन्साळी यांचा चित्रपट म्हटल्यावर प्रेक्षकांना नेहमीच त्यांचे चित्रपट पाहण्याचे वेध लागतात. एका वेगळया विचारानं प्रेरित झालेल्या भन्साळींचे चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहणे हा वेगळाच आनंद असतो.

Also Read - स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

हिरामंडीच्या निमित्तानं मीडियानं भन्साळी यांना बोलते जेव्हा केले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांविषयी सांगितले आहे. तसेच माझा रागीटपणा हा अनेकांना दिसतो पण त्यामागील माझी भावना काय असते हे त्या कलाकारांना एकदा विचारुन घ्या. मी चिडतो हे फक्त तो चित्रपट, त्यातील सीन आणि कलाकारांचे काम व्यवस्थित व्हावे यासाठी असते. बाकी त्यामागे कोणताही वैयक्तिक हेतू नाही.

मला जोपर्यत एखाद्या कलाकाराकडून मनासारखे काम करुन घेता आले नाही असे वाटते तोपर्यत मी त्याला त्रास देतच असतो. मग तो कोणताही कलाकार असो. त्यामुळेची की काय माझ्याकडे खूप रागीट दिग्दर्शक म्हणून पाहिले जाते. मी जोपर्यत सांगत नाही तोपर्यत कोणताही कलाकार हा व्हॅनेटी व्हॅनमध्ये जात नाही. अशी आठवण भन्साळी यांनी यावेळी सांगितली.

लोकांना तुमचा चित्रपट आवडतो म्हणजे काय, त्यातील सगळ्यांची मेहनत जेव्हा रंगते तेव्हाच तो चित्रपटही सगळ्यांना भावतो. हेच मला सांगायचे असते. त्यातून काहींना दुखावले जाते हे होतचं. पण मला माझा चित्रपट जास्त महत्वाचा असतो. अशीही भावना भन्साळींनी यावेळी व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT