Heeramandi Firs look Esakal
मनोरंजन

Sanjay Leela Bhansali च्या 'हीरामंडी' चा फर्स्ट लूक समोर.. 52 वर्षाच्या मनिषापुढं सोनाक्षीही दिसली फिकी..

ज्या काळात वेश्याही राणीसारख्या दिमतीत जगायच्या तो युग संजय लीला भन्साळी यांनी 'हीरामंडी'तून दाखवला आहे.

प्रणाली मोरे

Sanjay Leela Bhansali Heeramandi web series: 'गंगूबाई काठियावाडी'नंतर बॉलीवूडचे प्रसिद्ध फिल्ममेकर संजय लीला भन्साली वेब सीरिज जगतात एन्ट्री करत आहेत. संजय लीला भन्साली दिग्दर्शित 'हीरामंडी' ही वेब सीरिज या निमित्तानं लवकरच आपल्या भेटीस येत आहे.

याचा फर्स्ट लूक समोर आला असून त्यासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मनीषा कोईराला,सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी,रिचा चड्ढा,संजीदा शेख,शर्मिन सेगल या सगळ्यांचा रॉयल लूक समोर आला आहे.

या लूकनं सगळ्यांनाच क्रेझी करून सोडलं आहे आणि सोशल मीडियावर फक्त आता 'हीरामंडी' ची चर्चा सुरु झाली आहे.(Sanjay Leela Bhansali Heeramandi first look video viral)

या व्हिडीओत सुरुवातीस संजय लीला भन्साळी यांचे नाव दिसत आहे. ज्यानंतर मनीषा कोईराला,आदिती राव हैदरी,शर्मिन सेगल,रिचा चड्ढा आणि अखेरीस सोनाक्षी सिन्हाची झलक पहायला मिळते. सगळ्याजणी पिवळ्या रंगाच्या आऊटफीटमध्ये नजरेस पडत आहेत. हा सिनेमा लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असल्याचं देखील व्हिडीओत सांगण्यात आलं आहे.

हीरामंडीच्या फर्स्ट लूक व्हिडीओत त्या जमान्याची झलक दाखवण्यात आली आहे,जेव्हा वेश्या राण्यांसारखं आयुष्य जगायच्या. या व्हिडीओला शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,'' संजय लीला भन्साली यांनी बनवलीय आणखी एका युगाची,हरवलेल्या श्रीमंत काळाची आणि जादुई दुनियेची कहाणी..ज्याची आपण सगळेच वाट पाहत आहात. ही हीरामंडीच्या एका सुंदर जगाची एक झलक आहे. लवकरच भेटीस येत आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT