sanjay leela bhansali sushant 
मनोरंजन

सुशांतला भन्साळींनी ऑफर केले होते ४ सिनेमे?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपुतने आत्महत्या केली मात्र त्याच्या पाठीमागे अनेक प्रश्नांची यादी तो सोडून गेला. त्याच्या आत्महत्येनंतर अनेक गंभीर विषयांवर आता चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान सुशांतच्या आत्महत्येला बॉलीवूडमधील एक गट जबाबदार असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या विरोधात देखील तक्रार होती..

वकिल सुधीर कुमार ओझा यांनी भन्साळींसोबतंच आणखी ७ जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. यात करण जोहर, एकता कपूर आणि सलमान खान यांच्या नावाचा देखील समावेश आहे. यांच्यावर असा आरोप करण्यात आला आहे की सुशांतच्या विरोधात कट रचून त्याचे सिनेमे रिलीज होऊ दिले गेले नाहीत. याचा परिणाम म्हणून नैराश्याने सुशांतने आत्महत्या केली असं त्यांचं म्हणणं आहे. अभिनेत्री कंगना रणौत या सगळ्या प्रकरणात साक्षीदार म्हणून पुढे येऊ शकते अशा चर्चा आहेत. 

मात्र एका सुत्राने असा दावा करत या आरोपांचं खंडन केलं आहे की 'भन्साळी आणि सुशांत एकमेकांची केवळ प्रशंसा करत नव्हते तर ते दोघं एकत्र ४ सिनेमांवर काम देखील करणार होते. सुत्रांच्या माहितीनुसार, इंडस्ट्रीमध्ये अनेकजण सुशांतच्या मृत्युवर दुःख व्यक्त करत आहेत. अनेक लोकांना हे माहित देखील नसेल की सुशांत आणि भन्साळींना एकमेकांचं काम खूप आवडत होतं. इतकंच नाही तर दोघं ४ वेळा एकमेकांसोबत काम देखील करणार होते. भन्साळींना ४ सिनेमे सुशांतला ऑफर केले होते मात्र तारखेच्या कारणाने हे जमून येऊ शकलं नाही.'

सुत्रांनी पुढे सांगितलं, 'ज्यावेळी एका ग्रुपच्या लोकांनी भन्साळींवर जयपूरमध्ये हल्ला केला होता तेव्हा सुशांतच्या त्याच्या नावातून राजपूत काढून टाकलं होतं. त्यावेळी सुशांतने भन्साळींना भक्कम पाठिंबा दिला होता. सुशांतच्या त्या हल्लाच्या निषेध केला होता तेव्हापासून दोघांमध्ये चांगले संबंध होते.'  

sanjay leela bhansali offered 4 films to sushant singh rajput  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT