Sanjay Varma Famous Editior Death Karan Arjun Kaho Na Pyar Hai esakal
मनोरंजन

Sanjay Varma Death : करण-अर्जून, कहो ना प्यार है, चित्रपटाचे एडिटर संजय वर्मा कालवश! 'द लास्ट शो' ठरला शेवटचा चित्रपट

वर्मा यांच्या जाण्यानं बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींना मोठा धक्का बसला आहे.

युगंधर ताजणे

Sanjay Varma Famous Editior Death Karan Arjun Kaho Na Pyar Hai : बॉलीवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. करण अर्जून, कहो ना प्यार है, कोई मिल गया सारख्या वेगवेगळ्या चित्रपटांचे एडिटर म्हणून लोकप्रिय झालेल्या संजय वर्मा यांचे निधन झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं गौरविण्यात आले होते.

वर्मा यांच्या जाण्यानं बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींना मोठा धक्का बसला आहे. आपल्या कर्तृत्वामुळे वर्मा यांनी त्यांच्या नावाची वेगळी ओळख चित्रपटसृष्टीमध्ये निर्माण केल्याचे दिसून आले. प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या आवडीचे एडिटर म्हणून वर्मा यांचे नाव घेतले जात असे. त्यांनी वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये एडिटर म्हणून काम पाहिले होते.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

वर्मा यांना ऋतिकच्या कहो ना प्यार है साठी फिल्मफेयरचा पुरस्कार मिळाला होता. राकेश रोशन यांच्यासोबत त्यांनी अनेक फिल्म्स केल्या. कोई मिल गयाचे एडिटिंग देखील त्यांनीच केले होते. बॉलीवूडमधील कित्येक मोठमोठ्या दिग्दर्शकांसोबत वर्मा यांनी काम केले होते. त्यांचे नाव बॉलीवूडमधील सर्वोत्तम एडिटरपैकी एक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या जाण्यानं बॉलीवूडवर मोठी शोककळा पसरली आहे.

वर्मा हे प्रसिद्ध एडिटर्सपैकी एक होते. ते साउंड डिझायनरही होते. वर्मा यांच्या चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास त्यांनी कोई मिल गया, सलमान-शाहरुखचा करण अर्जुन, रेखा यांचा खून भरी मांग या चित्रपटांचे एडिटिंग केले होते.

द लास्ट शो हा वर्मा यांचा एडिटिंग केलेला शेवटचा चित्रपट होता. त्या चित्रपटाला सर्वोत्तम गुजराती चित्रपटाचा पुरस्कार मिळाल्याचे दिसून आले. २०२१ मध्ये आलेल्या या गुजराती चित्रपटाची ऑस्करसाठी भारताकडून अधिकृतपणे निवड करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT