Sanjeev Kapoor news  esakal
मनोरंजन

Sanjeev Kapoor: प्रसिद्ध शेफ संजीव कपूरवर 'बायोपिक', हंसल मेहतांचं दिग्दर्शन

प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती लवकरच केली (Sanjeev Kapoor) जाणार आहे.

युगंधर ताजणे

Tv Entertainment News: प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती लवकरच केली (Sanjeev Kapoor) जाणार आहे. स्कॅम 1992 या हर्षद मेहतावर आधारित वेबसीरिजची निर्मिती करणारे हंसल मेहता या बायोपिकचे दिग्दर्शन करणार (Bollywood movie news) असल्याचे सांगण्यात आले आहे. संजीव कपूर हे टीव्ही मनोरंजनाच्या दुनियेत नेहमीच लोकप्रिय राहिले आहे. त्यांच्या खाना खजाना नावाच्या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. 90 च्या दशकांत फुड (Hansal Mehta) रेसिपीविषयीच्या कार्यक्रमांना मोठं ग्लॅमर मिळवून देण्याचे काम त्यांनी केले होते.

2013 मध्ये आलेल्या त्यांच्या एका शो ने तुफान लोकप्रियता मिळवली होती. महिला वर्गामध्ये देखील त्याचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले होते. त्यामुळे जवळपास प्रत्येकाला संजीव कपूर यांचे नाव माहिती आहे. आता त्यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक निर्मिती केली जाणार असल्याचे कळताच चाहत्यांमध्ये आनंद आहे. त्यांना आता या बायोपिकची उत्सुकता लागली आहे. हंसल मेहता यांनी या बायोपिकची मुंबईमधील एका कार्यक्रमामध्ये घोषणा केली. यावेळी संजीव कपूर म्हणाले, खरं तर मी बायोपिकसाठी तयार नव्हतो. अजुन मला खूप काही करायचे आहे. त्याच्या अगोदरच बायोपिक ही जरा वेगळी गोष्ट वाटते.

प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम आणि त्यांचा प्रतिसाद या जोरावर पाककलेला मोठी प्रसिद्धी मिळाली. त्याचे श्रेय हे प्रेक्षकांनाच जाते. आता बायोपिकच्या माध्यमातून एक वेगळा प्रवास आपल्यासमोर येईल. त्यालाही तुमचा मोठा प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. माझ्या बायोपिकची निर्मिती हंसल मेहता करणार आहे. त्यांच्याविषयी एक गोष्ट मला सांगायची आहे. ती म्हणजे फार पूर्वीपासून ते मला बायोपिक करण्याविषयी सांगत आहे.

हंसल मेहता हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी माझ्या आयुष्यावर बायोपिकची निर्मिती होऊ शकते असे मला सांगितले. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास असून मी देखील माझ्या बायोपिकसाठी उत्सुक आहे. फार पूर्वी जेव्हा संजीव कपूर हे त्यांच्या खाना खजाना नावाच्या शो मधून समोर आले तेव्हा त्या शो चे दिग्दर्शन देखील हंसल मेहता यांनीच केले होते. अद्याप त्यांची भूमिका कोण करणार याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT