sankarshan karhade 
मनोरंजन

अभिनेता संकर्षण क-हाडे 'या' रिऍलिटी शोमधून लवकरंच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा व्हिडिओ

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई-  अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला प्रेक्षकांनी अभिनय, निवेदन आणि कविता करताना ऐकलं आहे, पण आता संकर्षणचं गाणं ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. संकर्षणने त्याच्या करिअरच्या सुरुवातीपासूनंच मालिका, रिऍलिटी शो, कॉमेडी शो आणि एँकरिंग अशा वेगवेगळ्या गोष्टी आजमावून पाहिल्या आहेत आणि म्हणूनंंच यावेळी प्रेक्षकांना त्याच्या गाण्याची कला पाहण्याची संधी मिळणार आहे.

२१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ‘सिंगिंग स्टार’ या सोनी मराठीवरील कार्यक्रमात संकर्षण कऱ्हाडेही दिसणार आहे आणि गाणं गाण्यासाठी त्याची मार्गदर्शक आणि जोडीदार असणार आहे केतकी भावे-जोशी. आपल्या गोड आवाजानं केतकीनंही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

संकर्षण लहानपणी काही वर्षं गाणं शिकला आहे, पण संकर्षण उत्तम कविता करतो. त्याच्या कविता सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रेक्षक ऐकतच असतात. त्याला गाण्याची उत्तम जाण आहे आणि कवितेतला त्याचा रस त्याला उत्तम गाणं गाण्यात नक्की मदत करेल, असा विश्वास केतकीला आहे. केतकी आणि संकर्षण यांनी याआधी कधीही एकत्र काम केलेलं नाही, पण ‘सिंगिंग स्टार'च्या निमित्तानं त्यांची भेट झाली. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आपापल्या घरी राहूनच संकर्षण आणि केतकी गाण्याचा रियाज करतात.

sankarshan and ketki will be seen together in new show singing star  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT