Sankarshan Karhade Esakal
मनोरंजन

Sankarshan Karhade: पहाटे अडीच वाजता मंदिरात गेलो अन्... अंबाबाईच्या दर्शनाला गेलेल्या संकर्षणला आला विलक्षण अनुभव! पोस्ट व्हायरल

एक गोड अनुभव संकर्षणने सोशल मिडीयावर शेअर केलाय. बघा काय घडलं.

Vaishali Patil

Sankarshan Karhade News: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणुन संकर्षण कऱ्हाडेला ओळखलं जातं. संकर्षणने आजवर विविध माध्यमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मग ते नाटक असो, सिनेमा असो किंवा मालिका.

प्रत्येक माध्यमात संकर्षण त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करतोय. अभिनय क्षेत्राबरोबरच तो सोशल मिडियावर देखील कमालीचा सक्रिय आहे. तो नेहमी काही ना काही पोस्ट चाहत्यांसोबत शेयर करत असतो.

आताही त्याने चाहत्यांसोबत अशीच एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यात त्याने कोल्हापुरातील अंबाबाईच्या दर्शनाचा अनुभव सांगितला आहे.

संकर्षण आपल्या पोस्टमध्ये लिहितो की, सुप्रभात आज पहाटे २.३० पासुनचा अनुभव कार्तिक मासामध्ये महालक्ष्मी देवीच्या ; अंबाबाई च्या नित्योपचारात बदल होतो.. पहाटे २.३० वा. मंदिर उघडते आणि काकडा सुरू होतो.

मशाल घेउन देवीच्या कळसापासून कापूर लावण्यास सुरवात होते ते गाभाऱ्यातल्या जवळपास १५० मंदिरांच्या ठिकाणी कापूर प्रज्वलीत केला जातो.

पहाटे ३ / ३.३० वा. सगळा परिसर कापूराच्या ज्योतीने ऊजळेला पाहून काय प्रसन्न वाटत होतं. त्यात हे सगळं सनईच्या गोड आवाजात ….

हे करता करता देवीसमोरचं दार म्हणजे मुख्य गर्भगृह उघडलं जातं आणि देवीला “ऊठ ऊठ माते अरुणोदय झाला” अशी साद घालत जागं केलं जातं देवीची काकडा आरती केली जाते.

काल सांगलीचा रात्रीचा प्रयोग करून मी पहाटे २.३० वा. मंदिरात आलो हा सगळा सोहळा मला पहिल्यांदाच पहाता आला… अनुभवता आला…. आणि तुम्हाला सांगतो ; देवीच्या पायवर डोकं ठेउन दर्शन घेता आलं” काय सांगावं कसं वाटलं.. माझे डोळे सतत भरून येत होते.. मनांत काय भाव आले हे सांगताच येणार नाही असा हा अनुभव होता."

त्याच्या नाटकाबद्दल सांगताना संकर्षण लिहितो की, " कालचा सांगलीचा प्रयोग जोरदार झाला .. आता आज २२ नोव्हेंबरला. तू म्हणशील तसं चा प्रयोग रात्री. ९.३० वा. इचलकरंजी , घोरपडे नाट्यगृहात व उद्या २३ नोव्हेंबरला. रा. ९.३० वा. सातारा , शाहू कलामंदिरात. नक्की या "

सध्या संकर्षण त्याच्या नाटकात व्यस्त आहे. मात्र आपल्या व्यस्ततेतून वेळ काढत त्याने देवीच दर्शन घेतले आणि त्याला दिव्य अनुभवही आल्याचे त्याने या पोस्टमध्ये सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT