Sapna Choudhary Latest News प्रसिद्ध हरयाणवी डान्सर सपना चौधरी सोमवारी (ता. १९) लपून कोर्टात हजर झाली. सपनाला न्यायालयाने ताब्यात घेतले आहे. लखनऊला आल्यानंतर सपना चौधरीने (Sapna Chaudhary) कोणालाही कळू दिले नाही. सोमवारी ती खोली क्रमांक २०४ मध्ये असलेल्या एसीजेएम ५ शंतनू त्यागी यांच्या न्यायालयात हजर झाली. न्यायालयाने जारी केलेले अटक वॉरंट रद्द करण्यासाठी सपना येथे आली होती.
१ मे २०१९ रोजी सपना चौधरीवर विश्वासभंग आणि फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी २० जानेवारी २०१९ रोजी आयोजक जुनैद अहमद, इवाद अली, रत्नाकर उपाध्याय आणि अमित पांडे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. १३ ऑक्टोबर २०१९ रोजी लखनऊच्या स्मृती उपवनमध्ये दुपारी ३ ते १० या वेळेत सपनाचा (Sapna Chaudhary) कार्यक्रम होता.
कार्यक्रमात प्रवेशासाठी तिकिटांची ऑनलाइन आणि ऑफलाईन प्रति व्यक्ती ३०० रुपये दराने विक्री करण्यात आली. हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो लोकांनी तिकिटे खरेदी केली होती. मात्र, सपना चौधरी रात्री १० वाजेपर्यंत आली नाही. कार्यक्रम सुरू न झाल्याने लोकांनी गोंधळ घातला. मात्र, आयोजकांनी तिकीट धारकांचे पैसे परत केले नाहीत. १४ ऑक्टोबर २०१८ रोजी आशियापोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.