Sapna Choudhary esakal
मनोरंजन

Sapna Choudhary : सपना चौधरीनं सोशल मीडियाला केलं 'अलविदा'

सकाळ डिजिटल टीम

सपना चौधरीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.

सपना चौधरीच्या (Sapna Choudhary) चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ही बातमी समजल्यानंतर तिचे चाहते नाराज होणार, हे मात्र नक्की! कारण, सपना चौधरीनं सोशल मीडियाला (Social Media) काही काळासाठी 'अलविदा' केल्याचं बोललं जातंय. खुद्द सपनानं तिच्या इन्स्टा पोस्टवरुन ही माहिती दिलीय.

सपनानं इन्स्टा पोस्टव्दारे लिहिलंय, राम राम.. प्रकृती अस्वास्थ्यामुळं मी अपडेट राहणार नाहीय. मला माफ करा; पण लवकरच भेटू! अशी सपनानं पोस्ट लिहून शेअर केलीय. तिच्या या पोस्टमुळं चाहते चिंताग्रस्त झाल्याचं पहायला मिळतंय. सपना चौधरीच्या प्रकृतीबाबतही ते चिंतेत आहेत. सपना चौधरी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. सुंदर फोटो, मजेदार रिल्स अपलोड करत असते. सपनाचं सुंदर फोटो पाहून चाहते आपला संपूर्ण दिवस घालवतात. मात्र, सोशल मीडियाला 'अलविदा' केलाय.

सपनानं किती दिवसांपासून सोशल मीडियातून ब्रेक घेतलाय, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. काही दिवस सपना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह दिसणार नाही एवढंच समजतंय. मध्य प्रदेशातील एका लाईव्ह शोदरम्यान सपना चौधरीची तब्येत बिघडल्याचं वृत्त आहे. ती स्टेजवर नाचत होती. यावेळी तिच्या पोटात दुखू लागलं, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सपना घरीच स्वतःची काळजी घेत आहे. यासाठीच सपनानं काही दिवस सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Super 8s Schedule : भारतीय संघाचे 'सुपर ८' मधील वेळापत्रक ठरले; बघा कोणत्या तीन संघांचा सामना करणार अन् कधी...

Buldhana Crime: हुंड्याच्या छळामुळे विवाहितेने संपवले जीवन; पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तुम्हालाही राग येतो? हृदय विकाराचा वाढतो धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Update : राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता

Sangli Fire : नशेखोरांकडून मोकळ्या इमारतीत आग; भरदिवसा धिंगाणा, महापालिकेच्‍या अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आग

SCROLL FOR NEXT