sapna choudhary talks about controversy on her dance  
मनोरंजन

'जर माझा डान्स वाह्यात असेल तर...'; सपना चौधरीचं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

शर्वरी जोशी

मुंबई : सपना चौधरी हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन राहिलेलं नाही. आपल्या दिलखेचक अदा आणि डान्सच्या तालावर सपनाने अनेकांना ताल धरायला लावला आहे. त्यामुळे या हरयाणवी डान्सरचे आज तुफान चाहते असल्याचं पाहायला मिळतं. सपना लवकरच एका कार्यक्रमाच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. 'मौका ए वारदात' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना ती पाहायला मिळणार आहे. गुन्हेगारी घटनांवर भाष्य करणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सपनाने अलिकडेच एका मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने समाज आणि तिच्या करिअरविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. इतकंच नाही तर तिने ट्रोलर्सलादेखील सडेतोड उत्तर दिलं आहे. 'मौका ए वारदात' या कार्यक्रमात काही महिलांवरील अन्याय, अत्याचाराच्या घटनांवर भाष्य करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमाच्या माध्यमातून सपना पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर झळकणार आहे.

"खरं तर या सगळ्या प्रकारात मला पूर्णपणे सरकारची चूक आहे असं वाटतं. कारण जोपर्यंत चुकीचं वर्तन करणाऱ्या स्त्री किंवा पुरुष  जे कोणी असतील त्यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत बदल घडणार नाही. दोन- चार जणांना शिक्षा झालीही असेल. परंतु,  एखादी कठोर शिक्षा झाली की लोकांच्या मनात आपोआप भीती निर्माण होईल. मला तर वाटतं एक तरी अशी शिक्षा व्हावी ज्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण होईल. जर बलात्कार करणारी व्यक्ती असेल तर त्याला पहिले चप्पलेने मारलं पाहिजे, त्यानंतर त्याला फरफटत नेत त्याला जीवंतपणे मृत्यूची शिक्षा दिली पाहिजे. दरवेळी कोणताही गुन्हा घडला की मुलींना दोष दिला जातो. तिने कपडेच चुकीचे परिधान केले होते?, ती रात्री उशीरापर्यंत घराबाहेर का राहते? असे प्रश्न विचारले जातात. इतकंच नाही तर तुमच्या कलेवरदेखील बोट ठेवलं जातं", असं सपना म्हणाली.

पुढे ती म्हणते, "अश्लीलता हा लोकांच्या मानसिकतेचा भाग आहे. हे त्यांच्या डोक्यात फिक्स बसलं आहे. जर माझी डान्स करण्याची स्टाइल अश्लील असेल, तर ब्युटी कॉन्टेस्टमध्ये बिकिनी परिधान करुन रॅमवॉक करणं अश्लीलपणा नाही का? मी तर संपूर्ण अंगभर कपडे परिधान करुन डान्स करते. मग बॉलिवूडमधील आयटम सॉन्ग्स असतात त्यातदेखील अभिनेत्री तोकडे कपडे परिधान करुन डान्स करतात तोदेखील मग अश्लीलपणाच झाला. हे असंच होत आलं तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अश्लीलपणाच दिसून येईल. या सगळ्यांसोबत माझ्या डान्सची तुलना केली तर माझा डान्स कोणत्या दृष्टीने अश्लील झाला? यांच्या तुलनेत माझा डान्स फार साधा आणि व्यवस्थित आहे."

दरम्यान, सपना चौधरी कायम सोशल मीडियावर व्यक्त होत असते. अनेकदा तिने समाजात घडणाऱ्या घटनांवर उघडपणे भाष्य केलं आहे. काही दिवसांपूर्वीच सपना बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमध्येदेखील ती तितकाच चर्चेचा विषय ठरली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT