Sonu-Sara Google file photo
मनोरंजन

कोरोना रुग्णांच्या मदतीला धावली सारा; सोनू सूदनं केलं कौतुक

साराच्या या कामाचे सोशल मीडियावर सर्वजण कौतुक करत आहेत. साराने सोशल मीडियावर कोरोना रुग्णांना मदत करण्याचे आवाहनही केले होते.

सकाळ डिजिटल टीम

साराच्या या कामाचे सोशल मीडियावर सर्वजण कौतुक करत आहेत. साराने सोशल मीडियावर कोरोना रुग्णांना मदत करण्याचे आवाहनही केले होते.

मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक बॉलिवूड कलाकार कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) त्याच्या ‘सोनू सूद फाऊंडेशन’ (Sonu Sood Foundation) या संस्थेमार्फत कोरोना रुग्णांसाठी मदत करत आहे. नुकतीच या संस्थेला अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) मदत केली आहे. साराने ऑक्सिजन सिलिंडर्स खरेदी करण्यासाठी सोनू सूद फाऊंडेशनकडे मदतनिधी सुपूर्त केला आहे. साराने केलेल्या मदतीबद्दल सोनूने ट्विट करून कौतुक केले आहे. (Sara Ali Khan donates Sonu Sood foundation covid-19 help poors)

सोनूने ट्विट करून लिहले आहे की, ‘प्रिय सारा अली खान, सोनू सूद फाऊंडेशनसाठी दिलेल्या योगदानाबद्दल खूप खूप आभार. तुझ्याबद्दल अभिमान वाटतो आणि असंच पुण्यांच काम करत राहा. अशा कठीण परिस्थितीत पुढाकार घेऊन देशातील युवा पिढीला प्रेरित केलं आहे. सारा, तू हिरोसारखे काम केले आहेस.’ सोनूच्या या ट्विटवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करून साराचे कौतुक केले आहे. तसेच अनेकांनी सोनूच्या संस्थेच्या या मदत कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

साराच्या या कार्याचे सोशल मीडियावर सर्वजण कौतुक करत आहेत. साराने सोशल मीडियावर कोरोना रुग्णांना मदत करण्याचे आवाहन केले होते. कोरोनाच्या या कठीण काळात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी गरजू लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सलमान खान, अजय देवगण, अक्षय कुमार, अनुष्का शर्मा, जॅकलिन फर्नांडिस या कलाकरांनी कोरोना रुग्णांसाठी मदत कार्य हाती घेतले. सोनू आणि साराने यापूर्वी रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ मध्ये एकत्र काम केले आहे. सारा लवकरच अक्षय कुमारसोबत 'अतरंगी रे' या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT