sara ali khan latest news esakal
मनोरंजन

Sara Ali Khan Injured : चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान साराला दुखापत, चांगलाच धडा मिळाला म्हणत शेयर केली पोस्ट!

सारा अली खाननं (Sara Ali Khan Injured) पोस्ट शेयर करत तिला झालेल्या दुखापतीविषयी माहिती दिली आहे.

युगंधर ताजणे

Sara Ali Khan Injured : प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान ही आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिला तिच्या एका चित्रपटाच्या प्रमोशन करताना अपघाताला सामोरं जावं लागल्याचे दिसून आले आहे. सारानं तिच्या इंस्टावरुन शेयर केलेल्या त्या पोस्टवरुन चर्चेला उधाणही आले आहे.

सारा ही लवकरच मर्डर मुबारक नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्यानंतर तिचा ए वतन मेरे वतन नावाचा देशभक्तीपर चित्रपटही प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सगळ्यात तिला अपघात झाल्याची बातमी व्हायरल होत आहे. जागरणनं याबाबत एक वृत्त दिलं आहे. सारानं तिला काय झाले आहे हे सांगितलं असून नेमक्या कोणत्या कारणामुळे तो प्रसंग घडला हे मात्र सांगितलेलं नाही.

साराबाबत सांगायचे झाल्यास गेल्या वर्षी तिचे काही प्रोजेक्ट समोर आले होते. मात्र त्याला प्रेक्षकांचा म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही. दोन वर्षांपूर्वी तिचा धनुषसोबत आलेल्या अतरंगी चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. आनंद एल राय यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आता तिच्या ए वतन मेरे वतन आणि मर्डर मुबारक नावाच्या चित्रपटाची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे.

साराला झाली दुखापत...

सारानं तिच्या ऑफिशियली इंस्टावरुन एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये तिनं तिच्या चाहत्यांना नमस्कार म्हटले आहे. सारा म्हणते मी आता एकाचवेळी दोन दोन चित्रपटांचे प्रमोशन करते आहे. या सगळ्यात मला पोटाचा त्रास सुरु झाला आहे.

या सगळ्यात मला मोठा धडा मिळाला आहे. दुर्देवानं ती गोष्ट आमच्यासोबत घडली. सारानं ही गोष्ट तिच्याविषयी कशी काय घडली हे मात्र सांगितलेलं नाही.

काही दिवसांपूर्वी साराच्या ए वतन मेरे वतन नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यात सारानं साकारलेल्या भूमिकेचे कौतुक होत आहे. त्या ट्रेलरमधून तिच्या वाट्याला आलेल्या भूमिकेविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. ए वतन मेरे वतन मध्ये साराची भूमिका ही आतापर्यतची सर्वात प्रभावी भूमिका असल्याच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT