Sara Ali Khan Khajrana Ganesh Mandir Esakal
मनोरंजन

Sara Ali Khan Khajrana Ganesh Mandir: मंदिरात सर्वसामान्यांना नो इंट्री सेलिब्रेटींसाठी पायघड्या असं का?

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही नेहमी सोशल मिडियावर चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपुर्वी ती तिच्या जरा हटके जरा बचके या चित्रपटामुळे चर्चेत होती.

विकी कौशलसोबत ती पहिल्यादाच या चित्रपटात दिसली. यावेळी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिने अनेक मंदिरांना भेट दिली. ज्यावरुन खुपच वाद झाला. अनेकांनी तिच्यावर टिका केली.

मात्र या टिकेला न जुमानता माझी श्रद्धा आहे आणि मी मंदिरात जातच राहणार असं सारानं स्पष्ट केलं. तसचं काहीस तिने केलंही.

सारा अली खान शनिवारी संध्याकाळी इंदूरमधील प्रसिद्ध खजराना गणेश मंदिरात पोहोचली. सारासोबत तिची टीमही होती. ती सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ती मंदिरात आली आणि 15 मिनिटे थांबली.

मंदिराचे पुजारी अशोक भट्ट यांनी सांगितले की, सारा अली खानच्या येण्याची माहिती दिलेली नव्हती. ती अचानक आली. मंदिराचे पुजारी पंडित विनीत भट्ट आणि पंडित पार्थ भट्ट यांनी सारा अली खानला देवाची पूजा करायला लावली.

सारा अली खानने विधीवत पूजा करून गणेशाचे आशीर्वाद घेतले. मात्र आता तिच्या मंदिरात जाण्यावरुन पुन्हा नवा वाद सुरु झाला आहे. सारा अली खान तिचा नवीन प्रोजेक्ट सुरु करण्याआधी देवाचे आशिर्वाद घेण्यासाठी आली असल्याचं बोलल जात आहे.

Sara Ali Khan Khajrana Ganesh Mandir

आता दुसरीकडे, साराने  इंदूरमधील खजराना गणेश मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केल्यावर काँग्रेसने टिका केली आहे.

मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यास मानाई आहे. तर साराने खजराना गणेश मंदिरात पोहोचून गर्भगृहात जावुन अभिषेकही केला. त्यामुळे काँग्रेसने मंदिरांमधील वाढत्या व्हीआयपी संस्कृतीचा निषेध केला आहे.

Sara Ali Khan Khajrana Ganesh Mandir

काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते नीलाभ शुक्ला म्हणाले याविषयी म्हणाले की, कोरोनामुळे खजराना गणेश मंदिरातील गर्भगृह भक्तांसाठी बंद आहे. लोकांना दुरूनच देवाचे दर्शन घ्यावे लागते.

त्याचबरोबर कलाकार, व्हीआयपी, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना सहज मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात.

गर्भगृह सर्वसामान्य भाविकांसाठी लवकर खुले करण्यात यावे असं न केल्यास काँग्रेस आंदोलन करेल. असं देखील ते म्हणाले.

त्यामुळे आता पुन्हा साराच्या मंदिरात जाण्यावरुन वाद सुरु होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT