sara ali khan new movie Ae Watan Mere Watan On Prime video released soon played usha mehta SAKAL
मनोरंजन

Sara Ali Khan: १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाची पार्श्वभूमी, सारा अली खान साकारणार 'ही' भूमिका

सारा अली खानच्या नवीन सिनेमाचं मोशन पोस्टर IFFI मध्ये लॉंच झालंय

Devendra Jadhav

Ae Watan Mere Watan: सारा अली खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. आजवर विविध भूमिका साकारुन साराने बॉलिवूड इंडस्ट्रीला तिची दखल घ्यायला भाग पाडलं. साराने कधी रोमँटिक तर कधी कॉमेडी व्यक्तिरेखा साकारुन प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं.

सारा अली खानच्या नवीन सिनेमाची घोषणा झालीय. या आगामी सिनेमात सारा अली खान पहिल्यांदाच क्रांतीकारकाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचं नाव ए वतन मेरे वतन.

काय असणार सिनेमाची कथा

सारा अली खानच्या 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटाची घोषणा झाली. करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही घोषणा केलीय. या चित्रपटात उषा मेहताच्या भूमिकेत सारा अली खान झळकत आहे. साराचा लूक समोर आला असून तिच्या लूकने सर्वांना आश्चर्यचकीत केलंय.

या चित्रपटात सारा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. १९४२ मधील भारत छोडो आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर साकारलेला 'ए वतन मेरे वतन' सिनेमा सत्य घटनांवर आधारीत आहे.

कोण होत्या उषा मेहता?

'ए वतन मेरे वतन' ची कथा मुंबईतील कॉलेजात शिकणाऱ्या उषा मेहता यांच्यावर आधारीत आहे. त्या स्वातंत्र्यसेनानी होत्या. ज्यांनी भारत छोडो आंदोलनादरम्यान रेडिओद्वारे देशभरात बातम्या प्रसारित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

वास्तविक, करण जोहरने काल सोशल मीडियावर घोषणा केली होती की 'ए वतन मेरे वतन' लवकरच प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सर्वांना या आगळ्यावेगळ्या सिनेमाची उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT