instagram
मनोरंजन

'अतरंगी रे' सारा...; दिल्लीपर्यत तिचीच चर्चा

#saraalikhan in 'Atrangi Re'

सकाळ डिजिटल टीम

'केदारनाथ' या चित्रपटातून आपल्या करियरची सुरुवात करणारी सारा अली खान (Sara Ali Khan) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. सारा अली खान नेहमीच तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. तिच्या छोट्या कारकीर्दीत साराला प्रचंड फॅन फॉलोईंग मिळाली आहे. सारा सध्या तिच्या आगामी चित्रपट 'अतरंगी रे' च्या प्रमोशनस् मध्ये चांगलीच बिझी आहे. सध्या ती दिल्लीमध्ये धमाल करत आहे.

तिच्या आजूबाजूला कव्वाली गायक 'कुन फाया कुन' गात आहेत. व्हिडिओमध्ये साराने गडद, हिरवा आणि जांभळा पारंपारिक पोशाख परिधान केलेला दिसत आहे. ती कव्वाली ऐकताना बीट्सवर चिटकी वाजवत गाण्याचा आनंद घेत आहे. तिने फेस मास्क देखील घातला आहे, ज्यावर तिच्या 'अतरंगी रे' मधील पात्राचे नाव 'रिंकू' असे लिहिले आहे. तिने पोस्ट केलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये तिने लिहिले, ''जुम्मा मुबारक. रिंकू हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्यात पोहोचली.''

आनंद एल राय दिग्दर्शित 'अतरंगी रे' मध्ये, सारा रिंकू नावाच्या एका बिहारी मुलीची भूमिका साकारणार आहे; ज्यामध्ये ती नवरा (धनुषने साकारलेली) आणि तिचा प्रियकर (अक्षय कुमारने साकारलेली) या दोघांवर प्रेम करते. अक्षय कुमार, सारा अली खान, धनुष आणि नसरुद्दीन शाह यांच्यासारखे दिग्गज अभिनेते या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. ताजमहलाच्या परिसरात या चित्रपटातील एका गिताचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

सिनेमातील 'चका चक' (Chaka Chak) हे गाणं हल्लीच प्रदर्शित झाले आहे. हे गाणे श्रेया घोषालने गायले आहे. या गाण्यची गंमत म्हणजे सारा तिच्या नवऱ्याच्या साखरपुड्यात नृत्य करताना दिसणार आहे.

याआधी चित्रपटाच्या म्युझिक लाँचच्या वेळी, आनंदने उघड केले की चित्रपटाचे शीर्षक हे आम्हाला सलमान खानने भेटच म्हणून दिले आहे. तो म्हणाला, "हे शीर्षक आमच्याकडे बरेच दिवस होते, पण जेव्हा आम्ही नोंदणी करायला गेलो तेव्हा आम्हाला कळले की, ते सलमान खानकडे आहे. पण त्याच्याबद्दल खूप छान वाटले की त्याने आम्हाला ते शीर्षक आनंदाने दिले."

गेल्या वर्षी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती परंतु कोविड-19 महामारीमुळे शूटिंग लांबणीवर पडली होती. चित्रपटाचे शूटिंग अखेरीस या वर्षाच्या सुरुवातीला पूर्ण झाले, 2021. हा चित्रपट हॉटस्टार वर 24 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित होईल. या सिनेमाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT