Sara Ali Khan shared a moment on kareena kapoor khans show
Sara Ali Khan shared a moment on kareena kapoor khans show  
मनोरंजन

सारा आणि सावत्र आई दिसल्या एकाच कार्यक्रमात, पाहा फोटो !

वृत्तसंस्था

मुंबई : सारा अली खानने काही वेळ्तच बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. केदारनाथ आणि सिंबा हे दोन चित्रपट तिने केले आणि दोन्ही चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरले. साराचे आई वडील दोघेही सेलिब्रिटी आहेत आणि तरीही साराने स्वत:ला सिद्ध केलं आहे. सारा वैयक्तिक आयुष्यातही जॉली व्यक्ती आहे. नुकतीच तीने एक मुलाखत दिली आणि तिही एका खास व्यक्तीला ! दुसरं तिसरं कोणी नाही तर सारान मुलाखत दिली आहे करीना कपूर खानला. जाणून घ्या नक्की त्यांच्यामध्ये काय संभाषण झालं !

सारा अली खान एक स्टार कि़ड आहे. पण तिने आजवर केलेल्या भूमिकांमधून आणि अभिनयाने तिने बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. दिवसेंदिवस ती प्रगती करत आहे. दोन सुपरहिट सिनेमांनंतर तिचे आगामी चित्रपट येण्यास तयार आहेत. नुकतीच तिने मुलाखत दिली ती करीना कपूर खानला !      

बेबो जरी साराची सावत्र आई असली त्यांचं नातं आईपेक्षा मैत्रीण म्हणून जास्त फ्रॅंक आहे. 'कॉफी विथ करण' मध्ये करीनाने खुलासा केला होता की, सारा तिला नावानेच हाक मारते. आईपेक्षा ती तिला मैत्रीण मानते. 

साराने करीनाचा रेडिओ शो "वॉट वूमन वॉंट'' यामध्ये नुकतीच हजेरी लावली होती. या शोमध्ये दोघीही सुंदर आउटफिटमध्ये दिसत आहेत. त्यांच्यामध्ये अनेक गप्पा झाल्या. कार्यक्रमादरम्यानचे फोटो आणि काही व्हिडीओ करीनाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आले आहेत. या शोचा एपिसोड युट्युबवर लवकरच रिलिज होईल. सारा आणि करीनाला एकत्र पाहून चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. 

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय आणि साऊथचा सुपरस्टार धनुष या दोन कलाकारांसोबत सारा दिसणार आहे. 'अतरंगी रे' असं त्या सिनेमाचं नाव असून त्याचा एक फोटो साराने शेअर केला. सारा तिच्या अभिनयाने बी-टाऊनमध्ये ग्रोथ करताना दिसतेय. एकाचवेळी ती दोन सुपरस्टार कलाकारांसोबत काम करताना दिसणार आहे.

दिग्दर्शक इम्तियाज अलीचा 'लव्ह आज कल' 14 फेब्रुवारीला म्हणजेच 'व्हॅलेंटाईन डे'ला आपल्या भेटीला येतोय. सारा अली खान आणि कार्तिक आर्यन या चित्रपटात मुख्य भूमिकेत असतील. 2009मध्ये आलेला सैफ अली खान आणि दीपिका पदुकोनचा पहिला 'लव्ह आज कल' आजही प्रेक्षकांचा आवडता आहे. त्यात इम्तियाज अली पुन्हा एकदा एक रेट्रो आणि सद्यस्थितीवर भाष्य करणारी लव्हस्टोरी घेऊन येत असल्याने त्याचे चाहते खूश आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT