Sara Ali Khan  Esakal
मनोरंजन

Sara Ali Khan Video: साराची 'अमरनाथवारी'! व्हिडिओ शेयर करत केला बाबा बर्फानीचा जयघोष..

Vaishali Patil

Sara Ali Khan At Amarnath Yatra: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते. अनेकदा मंदिर, मशिदी आणि गुरुद्वारांना या धार्मिक स्थळी भेटीही देत असते. काही दिवसांपुर्वीच सारानं चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान मंदिरांना भेटी दिल्या.

मात्र काहींना हे मुळीच पटल नाही. अनेकांनी तिला ट्रोल केलं.मात्र या टिकेला न जुमानता माझी श्रद्धा आहे आणि मी मंदिरात जातच राहणार असं सारानं स्पष्ट केलं. तसचं काहीस तिने केलंही.

यावेळी सारा बाबा बर्फानी यांच्या दरबारात दर्शनासाठी गेली आहे. सारा अली खानने तिच्या अमरनाथ यात्रेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

साराचा हा व्हिडिओ अमरनाथ यात्रेच्या आहे ज्यात ती हातात काठी घेऊन पायी प्रवास करताना दिसत आहे, एवढेच नाही तर सारा उत्साहाने हर हर महादेवचा जयघोष करत तिची यात्रा पुर्ण करत आहे.

सारा अली खान व्हिडिओमध्ये ट्रॅक सूट परिधान करून, डोक्यावर शाल घेवुन बाबा बर्फानीच्या येथील घंटा वाजवताना दिसत आहे. साराने प्रेक्षकांना तिच्या खास शैलीत अभिवादन केले आणि ती अमरनाथ यात्रेवर आल्याचं सांगितलं.

ती या व्हिडिओत अमरनाथच्या गुहेबाहेरील भाविकांची एक झलकही दाखवते. व्हिडिओत सारा अली खान बाबा बर्फानीच्या गुहेकडे जात आहे आणि इतर भक्तांसोबत तिचा प्रवास पुर्ण करत आहे.

सारा अली खान ही महादेवाची भक्त आहे. तिचा आणि शिवभक्तीशी विशेष संबंध आहे. 'केदारनाथ' हा तिचा पहिला चित्रपट होता ज्याने तिला बॉलिवूडमध्ये खूप ओळख मिळवून दिली. या चित्रपटाच्यावेळी देखील सारानं अनेकदा केदारनाथला भेट दिली आहे.

साराच्या कामाबद्दल बोलायचं झालं तरी नुकतिच विक्की कौशलसोबत जरा हटके जरा बचके चित्रपटात दिसली जो बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. आता ती अनुराग बसूच्या 'मेट्रो इन डिनो' चित्रपटात व्यस्त आहे.

यात तिच्यासोबत आदित्य रॉय कपूर, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख, अनुपम खेर, अली फजल आणि नीना गुप्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yugendra Pawar Engagement: युगेंद्र पवार आणि तनिष्काचा साखरपुडा सोहळा, पवार कुटुंब एकत्र!

Maharashtra Education : मराठी शाळांच्या सहभागाशिवाय 'विकसित महाराष्ट्र २०४७' व्हिजनची अंमलबजावणी कठीण

Kolhapur Circuit Bench Cases : १ लाख ७५ हजार खटले सर्किट बेंचकडे येणार, दोन न्यायाधीशांचे बेंच, जनहित याचिकाही शक्य होणार

रस्त्यावर पहाटे ४ पर्यंत दारूच्या नशेत लोळत पडलेला असायचा अभिनेता; पोलीस पकडायचे आता आहे अफाट श्रीमंत

Latest Marathi News Updates Live : उद्धव ठाकरेंकडे एवढा पैसा कुठून येतो? - नारायण राणे

SCROLL FOR NEXT