Sara Ali Khan Viral Video Esakal
मनोरंजन

Sara Ali Khan Viral Video: 'कानाखाली वाजवली असती!', सारा खानसोबत गैरवर्तन..चाहत्यांचा संताप

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली. यादरम्यान तिला एका चाहत्यांने साराला स्पर्श केला तेव्हा ती थोडी अस्वस्थ दिसली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sara Ali Khan News: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा चाहता वर्ग हा देशभर पसरला आहे. तिचा स्वभावामुळे चाहत्यांना ती खूप आवडते आणि लोकांना तिच्याशी जोडायला आवडत. याशिवाय ती पापाराझी किंवा चाहत्यांशी ज्या साधेपणाने वागते त्याचेही खूप कौतुक केले जाते.

ती इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय स्टारकिड आहे आणि बरेच लोक तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. ती जिथे जाते तिथे तिला पाहण्यासाठी गर्दी जमते. ती नुकतीच विमानतळावर स्पॉट झाली. यादरम्यानचा तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती एका चाहत्याला भेटल्यानंतर थोडी अस्वस्थ झालेली दिसत आहे.

सारा अली खान उदयपूरमध्ये होती, तेथून ती मुंबईला परतली. विमानतळावर चाहत्यांनी तिला पाहताचं घेराव घातला. लोक तिच्यासोबत सेल्फी काढू लागले. तेवढ्यात एक मुलगी आली आणि तिने साराशी हातमिळवणी केली. व्हिडिओमध्ये साराही हसत हसत फॅनशी हस्तांदोलन करताना दिसत आहे.

जेव्हा ती चाहती पुढे सरकते तेव्हा ती साराच्या केसांजवळ हात घेऊन तिला स्पर्श करते. हे सर्व काही सेकंदात घडते आणि अशा परिस्थितीत त्या चाहत्याचा हेतू काय होता हे ठरवता येत नाही.

पण साराचे हावभाव बघता हे स्पष्ट होते की, त्या काळात तिला अस्वस्थ वाटत होती. साराला क्षणभर धक्काच बसला. पण त्यानंतर तिने चेहऱ्यावर हसू घेऊन चाहत्यांसोबत फोटो क्लिक करायला सुरुवात केली.

साराची प्रतिक्रिया पाहून चाहते तिची खूप प्रशंसा करत आहेत. मात्र, तिचे चाहते त्या महिला चाहत्यावर नाराज आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट केली की, 'ती दागिने चोरण्याचा प्रयत्न करत होती. हे पाहून खूप वाईट वाटते.

भारताचे काय होणार? आणखी एका युजरने कमेंट केली, 'पण सारा खूप क्यूट आहे. तिच्यात अजिबात दिखावा नाही. एकाने कमेंट केली की, असे म्हटले जाते की कलाकार असभ्य वागतात, मात्र साराने तिच्या कानाखाली मारायला हवी होती.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती , सारा अली खान विक्रांत मॅसीसोबत 'गॅसलाइट' मध्ये दिसणार आहे. 'आये वतन मेरे वतन'मध्येही ती दिसणार आहे. तिने लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित विकी कौशलसोबतच्या चित्रपटासाठी आणि जगन शक्तीसोबतही चित्रपट साईन केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'इतकं घाणेरडं गाणं...' शाहरुख-ऐश्वर्याच्या आयकॉनिक गाण्याचा रिमेक पडला महाग, हुमा कुरेशी ट्रोल

Eleventh Admission : आजपासून अकरावीची पहिली विशेष फेरी; पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक ६ जुलैला होणार जाहीर

Vat Purnima 2026 : सात जन्मच काय; पण एक क्षणही पत्नी नको! पत्नी पीडितांची आगळीवेगळी 'पिंपळ पौर्णिमा', झाडाला घातल्या 108 उलट्या प्रदक्षिणा

Thane News : आता ऑपरेशन टायगर- ३? ठाकरेंचे १४ आमदार फोडण्याची तयारी, ८ जुलैला पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात कोर्ट आज निर्णय देणार

SCROLL FOR NEXT