sara ali khan  
मनोरंजन

ड्रग्स प्रकरणाचा सारा अली खानला बसला फटका, ‘या’ बिग बजेट सिनेमातून झाली हकालपट्टी

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई-  बॉलीवूडचं ड्रग्स प्रकरण गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. या ड्रग्स प्रकरणात बॉलीवूडच्या अनेक बड्या सेलिब्रिटींची नावं समोर आली होती. यामध्ये सैफअली खानची मुलगी अभिनेत्री सारा अली खानचं देखील नाव होतं.  सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या निमित्तानं अंमली पदार्थ विरोधी पथकानं केलेल्या तपासात अर्जुन रामपाल, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, भारती सिंह यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांसोबतच साराचं देखील नाव जोडलं गेलं होतं. मात्र तिच्याविरोधात कुठलाही पुरावा न सापडल्यामुळे एनसीबीनं तिला निर्दोष मुक्त केलं. मात्र हे ड्रग्स प्रकरण तिच्या करिअरला चांगलंच भोवलं आहे.  या ड्रग्जच्या आरोपांचा फटका तिच्या फिल्मी करिअरला आता बसला आहे. 

‘हिरोपंती २’ या आगामी सिनेमातून सारा अली खानला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अभिनेता टायगर श्रॉफचा ‘हिरोपंती २’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा सिनेमा २०१४ साली रिलीज झालेल्या ‘हिरोपंती’ या सिनेमाचा दुसरा भाग आहे. या बिग बजेट सिनेमासाठी अभिनेत्री सारा अली खानची निवड करण्यात आली होती. मात्र बॉलीवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार ड्रग्ज प्रकरणात तिचं नाव समोर आल्यामुळे या प्रोजेक्टमधून तिला बाहेर करण्यात आलं आहे. 

सारा अली खानचं नाव ड्रग्स प्रकरणात आढळून आल्याने तिच्यामुळे सिनेमाची नकारात्मक प्रतिमा प्रेक्षकांसमोर सादर होऊ शकते अशी भिती निर्मात्यांना वाटतेय. त्यामुळे साराऐवजी आता दुसऱ्या एखाद्या अभिनेत्रीची या सिनेमासाठी निवड केली जाणार असल्याचं समोर येतंय. या प्रकरणावर अद्याप सारा अली खानने कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तेव्हा साराच्या करिअरसाठी ड्रग्स प्रकरण हा खूप मोठा अडथळा ठरत असल्याचं चित्र आहे.   

sara ali khan was sacked from heropanti 2 after being linked to drug case and sushants death case report 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT