Sara Ali Khan Shubman Gill  Esakal
मनोरंजन

Sara-Shubman Breakup: त्या 'सारा'मुळं या सारा अन् शुभमनमध्ये बिनसलं? पॅचअप आधीच ब्रेकअप

Vaishali Patil

Sara-Shubman Breakup: सध्या सर्वत्र आयपीएलची रणधुमाळी सुरु आहे. दोन महिन्यापासून सुरु असलेल्या या आयपीएलचा आता शेवटचा सामना खेळला जाईल. मात्र यात शुभमन गिल जबरदस्त फॉर्ममध्ये आलेला दिसत आहे. शुभमन गिलने आयपीएल 2023 मध्ये तिसरे शतक ठोकले आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या क्वालिफायर-2 सारख्या मोठ्या सामन्यात गुजरातच्या या सलामीवीराने अवघ्या 49 चेंडूत दमदार शतक झळकावलं.

सध्या सोशल मिडियावर त्याचीच चर्चा सुरु आहे. मात्र त्याच्या खेळी सोबतच तो आणखी एका कारणामुळे सोशल मिडियावर चर्चेत आहे आणि त्याच कारण आहे बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान.

गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटर शुभमन गिलसोबत बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचं नाव जोडलं जात होते. त्याच्या डेटिंगच्या अफवा वेगानं पसरत होत्या.

दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा तेव्हा रंगली जेव्हापासून ते दोन-तीन प्रसंगी आउटिंगमध्ये एकत्र दिसले. त्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागले. आतापर्यंत दोघेही त्यांच्या नात्याबद्दल काही बोलले नव्हते.

मात्र आता पुन्हा दोघं चर्चेत आले मात्र यावेळी त्याच ब्रेकअप झालं असून शुभमन आणि सारा आधीच वेगळे झाले असल्याचा दावा करण्यात येत आहे.

 (Sara Ali Khan Shubman Gill Part Ways Both Unfollowed Each Other From Instagram)

शुभमन गिल आणि सारा अली खान यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. त्यामुळे आता दोघांमध्ये असं काय बिनसलं की ते वेगळे झाले असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. शुभमन आणि सारानेच वेगळं होण्याचा निर्णय घेतला असल्याच्याही चर्चा सुरु आहे.

सारा अली खानपूर्वी, शुभमन गिल सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला डेट करत होता आणि २०२० मध्ये त्यांच्या नात्याच्या अफवा पसरल्या. सारानं शुभमनला तिचा 'आवडता खेळाडू म्हटलं आणि आयपीएल 2020 दरम्यान त्याच्या फिल्डींगचं कौतुक केले.

शुभमन आणि सारा तेंडुलकर लवकरच त्यांचे नाते अधिकृत करतील असा अंदाज असतांनाच त्याच्याही ब्रेकअपची बातमी समोर आली.

मात्र अजूनही चाहते या दोघांनी चिडवत असतात. त्यामुळे या सारामुळे शुभमन गिल आणि सारा अली खान यांच्यात काहीतरी बिनसल असल्याच चाहते म्हणत आहेत.

दरम्यान, शुभमनने 'स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडरव्हर्स'मध्ये भारतीय स्पायडर-मॅन पवित्र प्रभाकरला आवाज दिला आहे.

शुभमनने मुंबई इंडियन्ससोबत आयपीएल सामन्यात धडाकेबाज इनिंग खेळली. त्यानंतर त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे.

तर सारा अली खान तिचा विकी कौशलसोबतचा चित्रपट जरा हटके जरा बचके च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT