Sara Tendulkar Google
मनोरंजन

सारा तेंडुलकर बॉलीवूड एन्ट्रीविषयी मोठा खुलासा; कुटुंबातील सदस्याची माहिती

सारा तेंडुलकर गेल्या काही दिवासंपासून अभिनयाचे धडे गिरवत होती,तसंच तिनं काही जाहिरातींमधूनही काम केलं आहे.

प्रणाली मोरे

क्रिकेटर सचिन तेंडूलकरची(Sachin Tendulkar) लाडकी कन्या सारा तेंडुलकर(Sara Tendulkar) प्रसिद्धिच्या बाबतीत आपल्या वडीलांपेक्षा कमी नाही हे गेल्या काही दिवसांत तिनं सिद्ध केलं आहे. ती दिसायला खूपच सुंदर असल्याकारणानं नेहमीच लोकांचं लक्ष आपल्याकडे वळवून घेण्यात यशस्वी ठरते. तिच्या चाहत्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. फक्त इन्स्टाग्रामवरच तिचे एक मिलियनपेक्षा जास्त फॅन फॉलॉइंग आहेत. आता साराशी संबंधित एक मोठी अपडेट समोर येतेय की ती लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे.

सारा तेंडुलकरच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे की आता त्यांची लाडकी सारा सिल्व्हर स्क्रीनवर दिसणार आहे. बॉलीवूड लाइफला मिळालेल्या माहितीनुसार साराच्या नातेवाईकांपैकी,म्हणजेच कुटुंबातील सदस्यानं सांगितलं आहे की,''ती लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिला अभिनयात आवड आहे आणि ती सध्या अभिनयाचे धडे देखील गिरवत आहे. तसं पहायला गेलं तर सारानं काही जाहिरातीतूनही काम केलंआहे. लंडन युनिव्हर्सिटीमधून मेडिकलचं शिक्षणही घेतलं आहे. पण तिचं आकर्षण मात्र नेहमीच ग्लॅमर वर्ल्ड राहिलं आहे,त्यामुळे तिला आपलं करिअर याच क्षेत्रात बनवायचं आहे''. सूत्रांनी पुढे म्हटलं आहे की,''सारा लाइमलाइटपासून नेहमीच दूर राहण्याचा प्रयत्न करते,पण आपल्या अभिनयामुळे ती लोकांना आश्चर्याचा धक्का मात्र देऊ शकते. ती खूप हुशार आहे आणि तिचे आई-वडील सचिन-अंजली नेहमीच तिला तिच्या निर्णयात पाठिंबा देतात''.

साराविषयी एक बातमी सध्या खूप चर्चेत होती की ती शाहिद कपूरसोबत सिनेमातून पदार्पण करणार आहे. पण या बातमीत काही तथ्य नसल्याचं स्वतः सचिन तेंडूलकरनं स्पष्ट केलं होतं. त्यानं म्हटलं होतं की,सारा सध्या अभ्यासात व्यस्त आहे आणि सिनेमात येण्याविषयी ती इच्छूक नाही. सारा तेंडूलकर सध्या २४ वर्षांची आहे. आणि सध्या ती मॉडेलिंग करत आहे. नेहमीच सोशल मीडियावर ती शेअर करत असलेले फोटो चाहत्यांचं आकर्षण ठरताना दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Video: शिवरायांनी अफजल खानाचा वध कसा केला? महाराजांचे भक्त असाल तर फक्त 7 मिनिटे वेळ काढा, थरारक AI व्हिडिओ व्हायरल

Pune Crime News : “मुळशीत पाय ठेवलास तर ‘मुळशी पॅटर्न’ करेन”; व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : महायुतीची ठाण्यात होणार आज बैठक; जागा वाटपांवर होणार चर्चा

तू भाई अपना काम कर...! Steve Smith सोबत 'राड्या'चा किस्सा रोहित शर्माने मजेशीर अंदाजात सांगितला; ०.४९ सेकंदाचा भन्नाट Video

Credit Card : ₹3,000 पर्यंत कॅशबॅक; झिरो जॉइनिंग फी; UPI पेमेंट्सवरही फायदा! जाणून घ्या या नव्या क्रेडिट कार्डच्या खास ऑफर्स

SCROLL FOR NEXT