Shubman Gill Sara Tendulkar 
मनोरंजन

Fact Check: 'आज तुझ्याकडून....'; सारा तेंडुलकरनं शुभमनसाठी खरंच ट्विट केलं का?

भारत विरुद्ध न्युझीलंडच्या सेमीफायनलच्या सामन्यात भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना जोरदार सुरुवात केली आहे.

युगंधर ताजणे

Sara Tendulkar X post viral for shubman Gill : भारत विरुद्ध न्युझीलंडच्या सेमीफायनलच्या सामन्यात भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना जोरदार सुरुवात केली आहे. कर्णधार रोहितनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर रोहित आणि शुभमननं खणखणीत सुरुवात करुन वानखेडेवर जमलेल्या हजारो चाहत्यांना खूश केल्याचे दिसून आले.

या सगळ्यात सोशल मीडियावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरच्या कथित ट्विटनं मात्र सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ब्ल्यू टिक असलेल्या सारा तेंडुलकर नावाच्या अकाऊंटवरुन काही वेळेपूर्वी दोनवेळा ट्विट केलं आहे. त्यात पहिल्यांदा शुभमननं अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याच्या आई वडिलांचा फोटो शेयर केला आहे. या फोटोवर कमेंट करताना तिनं म्हटलं की, आज शुभननं आपल्या आई वडिलांना गर्व वाटेल अशी कामगिरी केली आहे.

इतक्या लहान मुलांना फटाके वाजवायचे नसतात हे कसं समजवायचं?

शुभमन आणि सारा तेंडुलकर यांच्या मैत्रीविषयी सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा आहेत. साराला शुभमनवरुन अनेकदा चिडवल्याचंही दिसून आले आहे. काहींनी तिला ट्रोलही केले होते. अशातच सारानं कथितरित्या सोशल मीडियावर ज्या पोस्ट केल्या आहेत त्यामुळे ती चर्चेचा विषय झाली आहे. आताही तिनं एक्सवर जी पोस्ट केली आहे त्याची जोरदार चर्चा आहे. यावेळी तिनं शुभमनं कडून खास अपेक्षाही केली आहे. मात्र ही पोस्ट सारानं तिच्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन केली आहे किंवा नाही याबाबत शंका आहे. सोशल मीडियावरील त्या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

साराची ती पोस्ट नेटकऱ्यांच्या खास चर्चेचा विषय आहे. सारा त्या पोस्टमध्ये म्हणते की, "आज मला तुझ्याकडून शतकाची अपेक्षा आहे" साराची ही पोस्ट व्हायरल होताच ती सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये होती. तिच्यावर वेगवेगळ्या पोस्टही व्हायरल व्हायल्या सुरुवातही झाल्या. नेटकऱ्यांनी देखील शुभमन काहीही झालं तरी शतक पूर्ण करणारच अशा कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

फॅक्ट चेक

आता सारा तेंडुलकरच्या या पोस्टबाबत जी चर्चा सुरु आहे ते अकाऊंट तिचं स्वतः ट्विटर अकाऊंट नसल्याचं आमच्या फॅक्टचेकमधून समोर आलं आहे. कारण ज्या अकाऊंटवरुन शुभमनसाठी ही पोस्ट करण्यात आली आहे. ते अकाऊंट सारा तेंडूलकर नावाचं अकाऊंट असून त्याला ब्ल्यू टिक देखील आहे.

तसेच याचा प्रोफाईल फोटो देखील साराचाच आहे. पण तुम्ही जर या अकाऊंटचा बायो चेक केला तर त्यात Sara Tendulkar • Parody • Model असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळं हे पॅरोडी अर्थात विडंबनात्मक अकाऊंट आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये हे अकाऊंट तयार करण्यात आलं आहे. तसेच या अकाऊंटवरुन 32 जणांना फॉलो करण्यात आलं आहे. तर 124.2 K इतके फॉलोवर्स आहेत. त्याचबरोबर सारा तेंडुलकरचं ट्विटरवर अधिकृत असं कुठलंही अकाऊंट नाही, अशीही खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suvendu Adhikari PA Murder : सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाची गोळ्या झाडून हत्या; तृणमूल काँग्रेसची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Rehabilitation News: धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावणार: मंत्री मकरंद पाटील, मंत्रालयातील बैठकीत महत्त्वाचे निर्णय, बेकायदेशीर जमीन वाटपाची होणार पुनर्तपासणी!

LPG Cylinder Price List: एलपीजी सिलिंडरच्या नवीन दरसूची जाहीर; घरगुती ते व्यावसायिक सिलिंडरची किंमत जाणून घ्या

Maharashtra Education News: शिक्षण विभागाचा माेठा निर्णय! शिक्षकांसाठी वार्षिक ५० तास प्रशिक्षण सक्तीचे, गुणवत्तावाढीसाठी सरकारचे पाऊल..

Suvendu Adhikari assistant Killed : सुवेंदू अधिकारींचा पीए चंद्रनाथ रथ यांची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या, ममतांवर आरोप; असा आहे घटनाक्रम

SCROLL FOR NEXT