मनोरंजन

Sarabhai Vs Sarabhai फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचे कार अपघातात निधन

वैभवीच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

धनश्री ओतारी

साराभाई वर्सेस साराभाई मालिका फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय यांचे कार अपघातात निधन झाले आहे. वैभवीच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.(Sarabhai vs Sarabhai actor Vaibhavi Upadhyaya dies in car accident )

मिळालेल्या माहितीनुसार, वैभवी उपाध्याय यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. हिमाचल प्रदेशमध्ये एका कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला. ती ३२ वर्षांची होती. चंदिगड येथील तिचे कुटुंबीय अभिनेत्रीचे पार्थिव मुंबईत आणत आहेत. (Entertainment News in Marathi)

वैभवीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सीआयडी, अदालत आणि साराभाई वर्सेस साराभाई या लोकप्रिय मालिकांमध्ये तिनं आपली भूमिका बजावली आहे. साराभाई मालिकेतील जास्मीन या भूमिकेने वैभवीला विशेष ओळख निर्माण करुन दिली. (Entertainment News in Marathi)

दीपिका पादुकोणसोबतही काम...

वैभवीने २०२० मध्ये बॉलीवूडची मस्तानी दीपिका पादुकोणसोबत 'छपाक' आणि 'तिमिर' (२०२३) या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. गुजराती थिएटर जगतात अभिनेत्रीचं मोठं नाव होतं. टीव्ही शो 'साराभाई वर्सेस साराभाई' व्यतिरिक्त, वैभवीने 'क्या कसूर है अमला का' आणि 'प्लीज फाइंड अटॅच्ड' या डिजिटल सीरिजमध्येही काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT