saroj khan 
मनोरंजन

सरोज खान त्यांच्या ८ महिन्याच्या मुलीचं प्रेत दफन करुन त्याच संध्याकाळी 'दम मारो दम' गाण्याच्या शूटींगसाठी पोहोचल्या होत्या..

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- कोरिओग्राफर सरोद खान यांच्या गाण्याची करावी तेवढी स्तुती कमीच आहे. सरोज खान आज आपल्यात नाहीत मात्र त्यांच्या कामातून त्या आजही अनेकांच्या मनात राज्य करत आहेत. बॉलीवूडला त्यांनी जे काही दिलंय त्याचे ऋण ही इंडस्ट्री कधीच फेडू शकणार नाही. त्यांच्या एकूण करिअरमध्ये त्यांनी बॉलीवूडच्या २००० पेक्षा जास्त गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. सरोज यांना 'द मदर ऑफ कोरिओग्राफी इन इंडिया' अशी उपमा देखील दिली होती. त्यांचं कामंच तसं होतं. मात्र हा प्रवास एवढा सहज सोपा नव्हता. त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक वाईट दिवस पाहिले.कदाचित या गोष्टींमुळे सामान्य माणूस खचून गेला असता मात्र सरोज खान या खचून जाणा-यातील नव्हत्या. एक असाच किस्सा त्यांच्या मुलीच्या मृत्युशी संबंधित आहे.

२०१४ साली सरोज यांनी एका मुलाखती दरम्यान त्यांच्या आयुष्याशी संबंधित या दुःखद घटनेबद्दल खुलेआम चर्चा केली होती. सरोज खान यांनी वयाच्या १३ व्या वर्षात डांस मास्टर सोहनलाल यांच्याशी लग्न केलं. ते सरोज यांच्यापेक्षा २८ वर्षांनी मोठे होते. १४ व्या वर्षी त्यांना एक मुलगा देखील झाला. ज्याचं नाव त्यांनी राजू(हामिद खान) ठेवलं. त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली. जी केवळ ८ महिनेच जगू शकली.

सरोज यांनी एका मुलाखतीत या घटनेबद्दल सांगताना म्हटलं होतं की, 'माझी मुलगी ८ महिने ५ दिवसांची होती जेव्हा तिचा मृत्यु झाला. तिला दफन केल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मी 'हरे राम हरे कृष्णा' सिनेमाच्या 'दम मारो दम' गाण्याच्या शूटींगला जाण्यासाठी ट्रेन पकडली होती.'

यानंतर सरोज यांना आणखी एक मुलगी झाली जिचं नाव त्यांनी कुकू ठेवलं. यानंतर मात्र सोहनलाल सरोज यांच्यापासून वेगळे झाले. २०११ मध्ये सरोज यांच्या या मुलीचं निधन झालं आणि त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. यादरम्यान मात्र त्यांनी काम करणं थांबवलं नाही. सोहनलाल यांच्यापासून वेगळं झाल्यावर सरोज यांनी सरदार रोशन खान यांच्याशी लग्न केलं होतं.  

रोशन यांच्यापासून त्यांना एक मुलगी झाली जिचं नाव त्यांनी सुकैना ठेवलं. सरोज खान या त्यांच्या कामाच्या अगदी पक्क्या होत्या. त्यांच्या मुलीने सांगितलं होतं की आईला जेव्हा कोणी कामातून ब्रेक घेऊन सुट्टीवर जायचं तेव्हा हसायला यायचं. सरोज यांनी त्यांच्या करिअरमध्येच कधीच सुट्टी घेतली नाही.    

saroj khan had boarded a train to choreography for song dum maro just after bury her 8 month old daughter

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rafale fighter jets India: आता शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या 'राफेल' लढाऊ विमानांची भारतात निर्मिती होणार!

Virar News : आंतरराष्ट्रीय किर्तीचे बॅलेनृत्य कलाकार नरेश नारायण उसनकर यांचे निधन

CM Devendra Fadnavis : सहकार्याची नवी दारे होणार खुली; महाराष्ट्र-अमेरिकेतील आयोवा राज्यामध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

Nashik News : शिवसेना (ठाकरे)-मनसेचा जनआक्रोश; नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर एकत्र मोर्चा

Disha Patani house firing अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार; ‘या’ गँगस्टरने घेतली हल्ल्याची जबाबदारी!

SCROLL FOR NEXT