Satvya Mulichi Satavi Mulagi new serial on zee marathi telecast in 12 september  sakal
मनोरंजन

 जे घडणार तेच ती बोलणार.. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' नवी मालिका..

अभिनेत्री तितिक्षा तावडे प्रमुख भूमिकेत, 'झी मराठी'ची नवी भेट..

नीलेश अडसूळ

zee marathi :आपल्याला नेहमीच भविष्यकाळात काय घडणार या विषयी कुतूहल असतं आणि भविष्य आपल्याला दिसू लागलं तर त्याचं आश्चर्यच वाटेल. अगदी असंच सातव्या मुलीची  सातवी मुलगी मालिकेतील नेत्राच्या आयुष्यात घडलंय. नेत्रा भविष्यात जे घडणार आहे, त्याबद्दल बोलते. पण लोक तिला समजून न घेता तिच्यावर दोषारोप करतात, त्यामुळे नेत्राला प्रत्येक वेळी नव्या आव्हानाला सामोरं जावं लागतं. अशा या नेत्राची गोष्ट लवकरच झी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे. (Satvya Mulichi Satavi Mulagi new serial on zee marathi telecast in 12 september lead cast titeeksha tawde nsa95)

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील नायिका नेत्राला भविष्यात काय घडणार हे दिसतं. त्यामुळेच गावातली सामान्य मुलगी असूनही ती असामान्य ठरलीय. नेत्राला साक्षात त्रिनयना देवीनेच भविष्य पाहू शकण्याचं वरदान दिलंय. नेत्राला तिच्याकडील या दिव्यशक्तीचा वापर समाजाच्या भल्यासाठी करायचा आहे. परंतु तिला भविष्य दिसत असलं तरी तिचं आयुष्य सोपं नाही. तिला अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. अशी ही नेत्रा वर्तमानातील आयुष्य जगताना भविष्याचा वेध कसा घेते, हे पाहणं उत्कंठा वाढवणारं असणार आहे. या मालिकेचं सादरीकरण गूढ रहस्यमय पद्धतीने करण्यात येणार असून मानवी भावभावनांचे, नातेसंबंधांचे अनोखे पैलू यात उलगडले जाणार आहेत.

या मालिकेत तितिक्षा तावडे आणि अजिंक्य ननावरे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसंच या मालिकेत ऐश्वर्या नारकर, मुग्धा गोडबोले,रजनी वेलणकर, अजिंक्य जोशी, जयंत घाटे, राहुल मेहेंदळे हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील. किरण बिडकर आणि अभिराम रामदासी हे या मालिकेचे लेखक आहेत. तर मालिकेची निर्मिती केली आहे आयरिस Production (विद्याधर पाठारे) यांनी. ही गूढ रहस्यमय मालिका १२ सप्टेंबर पासून झी मराठीवर सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT