Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 Esakal
मनोरंजन

Satyaprem Ki Katha Collection: सत्तुच्या कथेला मिळेल का प्रेक्षकांचे प्रेम? पहिल्या दिवसाचे कलेक्शन म्हणतंय...

Vaishali Patil

Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1: गेल्या काही दिवसांपासून कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या सुपरहिट जोडीच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाची चर्चा रंगली होती.

ही जोडी पुन्हा पडद्यावर दिसली आहे. गुरुवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटासाठी दोघांचे चाहतेही उत्सूक होते.

ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा निर्माते आणि प्रेक्षक दोघांना होती.

आता त्यातच 'सत्यप्रेम की कथा'चे पहिल्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा काही खास प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र आहे.

या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. यात कार्तिक आणि कियाराची वेगळी आणि भन्नाट प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडली आहे. चित्रपटाच कौतुकही होत आहे. हसत हसत हा चित्रपट काही तरी खास संदेश देवुन जातो.

'सत्यप्रेम की कथा' ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई केली यावर नजर टाकूया.

SacNilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'सत्यप्रेम की कथा' ने रिलीजच्या पहिल्या दिवशी अंदाजे 9 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांना या चित्रपटाकडून चांगल्या जास्त अपेक्षा होत्या मात्र आता निर्मात्यांना शनिवार आणि रविवारच्या आकड्यांकडून मोठ्या आशा आहेत. विकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, 'सत्यप्रेम की कथा'मध्ये कार्तिया आर्यनने सत्यप्रेम अग्रवालच्या भुमिकेत तर कियारा अडवाणी कथा कपाडियाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट सत्तु आणि कथा यांच्या अनोख्या प्रेमकथेवर आधारित आहे.

मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वान यांनी चित्रपटाच्या स्टार कास्टबद्दल सांगायचे तर, कार्तिक आणि कियारा व्यतिरिक्त, राजपाल यादव, गजराज राव, सुप्रिया पाठक, अनुराधा पटेल, शिखा तलसानिया यांच्यासह अनेक प्रतिभावान कलाकार आहेत. नाडियाडवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंट आणि नमह पिक्चर्स यांनी संयुक्तपणे या प्रकल्पाची निर्मिती केली आहे.

चित्रपटाच्या बजेटबद्दल बोलायचं झाल तर, सत्यप्रेम की कथा 50-60 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आली आहे आणि त्याव्यतिरिक्त, त्याच्या प्रमोशनवर 5 कोटी रुपये खर्च केले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे.

त्यामुळे आता हा चित्रपट बजेट पुर्ण करु शकेल की नाही आणि कार्तिक अन् कियाराच्या जोडीला 'भूल भुलैया 2' सारखा प्रतिसाद मिळेल की नाही हे पहावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Special Sitting Schedule : संसदेचे ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान विशेष कामकाज! लोकसभा आणि राज्यसभेच्या बैठकांबाबत किरेन रिजिजू यांची अधिकृत घोषणा

Property Card: फ्लॅट खरेदी-विक्री करायचाय? मग ही बातमी वाचाच! सरकारच्या निर्णयाचा महाराष्ट्रातील ७ कोटी घरमालकांना होणार फायदा

IND A vs SL A, Semi-Final: वैभव-अभिषेकची वादळी खेळी अन् मग तिलक - शाहबाजची फिफ्टी; भारताचे श्रीलंकेसमोर मोठे लक्ष्य

Tirupati Balaji Temple Record Gold Donation : तिरुपती बालाजीच्या चरणी भक्तीचा अनोखा महासागर! चेन्नईच्या जैन दाम्पत्याने अर्पण केले तब्बल १२१ किलो सोने अन् २३८ कॅरेट हिरे; किंमत पाहून व्हाल थक्क!

Latest Marathi News Live Update: ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर रामदास कदमांचा नवा दावा; 'माझ्याकडे आणखी...'

SCROLL FOR NEXT